Published on
:
24 Jan 2025, 12:20 am
Updated on
:
24 Jan 2025, 12:20 am
मुंबई, दिल्लीसह 17 राज्यांमध्ये दोन कोटींहून अधिक बांगला देशींनी घुसखोरी केल्याचे तपासातून पुढे आले आहे. केवळ दिल्ली आणि मुंबईच नव्हेतर देशातील अन्य राज्यांमध्येही घुसखोरी वाढत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अभिनेते सैफ अली खान यांच्यावर चाकू हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगला देशी घुसखोरी असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. बिजॉय दास या नावाने तो मुंबईत वास्तव्य करीत होता. 2016 सालीही मुंबई पोलिसांनी कुलसूम शेख या बांगलादेशी महिलेस अटक केली होती. ती मोहिनी या नावाने मुंबईत राहत होती. या पार्श्वभूमीवर देशातील अन्य राज्यांमध्येही बांगला देशी नागरिकांनी घुसखोरी केल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. शहरे आणि महानगरामध्ये बांगला देशी घुसखोर भीख मागत असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.
बंगळूर, दिल्ली, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक आदी राज्यांमध्ये बांगला देशी घुसखोरांनी ठिय्या मारला आहे. हिंदू नावे धारण करून ते वावरत आहेत. बांगला देशी नागरिक देशातील अनेक भागात घुसखोरी करीत असल्याने भौगोलिक रचना बदलत आहे. देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दोन कोटींहून अधिक बांगला देशींनी घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. 2007 साली संसदेत सर्वात प्रथम बांगला देशी घुसखोरांचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी तत्कालीन केेंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी देशात 1 कोटी 20 लाख बांगला देशी नागरिकांनी घुसखोरी केल्याचे संसदेत सांगितले होते. सिंह यांनी नंतर बांगला देशींच्या आकडेवारीबाबतचे निवेदन मागे घेतले होते. सीबीआयचे माजी संचालक जोगींदर सिंह यांनीही 2014 साली देशात पाच कोटींहून अधिक बांगला देशींनी घुसखोरी केल्याचे विधान केले होते. मात्र, या आकडेवारीचीही पुष्टी होऊ शकली नव्हती.
वैद्यकीय आणि पर्यटक व्हिसा घेऊन घुसखोर भारतात प्रवेश करतात. त्यानंतर ते मायदेशी न जात भारतामध्येच वास्तव्य करतात. बांगला देशींना घुससोरीस मदत करण्यासाठी दलाल मदत करतात. दलाल प्रत्येक घुससोराकडून पाच ते 15 हजार रुपये घेतात. त्यानंतर बनावट कागदपत्रे आणि नोकरीसाठी वेगवेगळे पैसे द्यावे लागतात. दिल्लीमध्ये बांगला देशी घुसखोरांना बनावट आधारकार्ड देणार्या टोळीचा पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला.
प. बंगालमध्ये 55 लाख, आसाममध्ये 50 लाख घुसखोर
देशाची लोकसंख्या 140 कोटींवर आहे. बांगला देशी घुसखोरीमुळे भौगोलिक रचना बदलत आहे. पश्चिम बंगालमध्ये 55 लाख तर आसाममध्ये 50 लाख बांगला देशींनी घुसखोरी केली आहे. आसाममधील 33 जिल्ह्यांतील मुस्लिमांची लोकसंख्या 50 ते 80 टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या वाढत असून हिंदूंची घटत असल्याचे समोर आले आहे. झारखंडमध्येही मुस्लिमांची लोकसंख्या वाढत असल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.