पूर्णा नदीपात्रात पुन्हा 3 मूर्ती आढळल्या:पुरातत्त्व विभागाने सखोल माहिती घ्यावी, जैन मंदिर विश्वस्तांकडून मागणी‎

3 hours ago 2
शहरानजीकच्या पूर्णा नदीपात्रात दुसऱ्या दिवशी गुरुवारीही आणखी तीन मूर्तींचे अवशेष सापडले. सर्व दुभंगलेल्या मूर्तींचे अवशेष तहसील कार्यालयात आणण्यात आले आहेत. बुधवारीही शहरालगत असलेल्या खोडकाईवाडीजवळील पूर्णा नदीपात्रात तीन मूर्तींचे अवशेष आढळून आले होते. याबाबतची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाला देताच महसूल व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन हे दुभंगलेले मूर्तींचे अवशेष तत्काळ तहसील कार्यालयात आणून ठेवले. गुरुवारी पुन्हा त्या परिसरात आणखी तीन मूर्तींचे अवशेष आढळून आले. या सर्व मूर्तींचे अवशेष तहसील कार्यालयात ठेवण्यात आले असून तहसीलदार संजय भोसले यांनी तातडीने पुरातत्त्व विभागास याबाबतची माहिती दिली आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केल्यावरच या मूर्तींबाबत निश्चित सांगितले जाईल, असे तहसीलदार भोसले यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. शहरातील श्वेतांबर जैन मूर्तिपूजक मंदिराचे विश्वस्त सुशील जैन व जिग्नेश नगारिया यांनी या मूर्तींची पाहणी केली असून त्यांनी या मूर्ती आदेश्वर भगवान, नेमिनाथ भगवान व पार्श्वनाथ भगवान यांच्या असून त्या मूर्तींवर शके ११८० असे कोरलेले असल्याचे सांगितले. यामुळे या मूर्ती पुरातन काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जवळपास १ हजार वर्षे जुन्या या मूर्ती अचानक नदीपात्रात सापडल्याने याबाबत पुरातत्त्व विभागाने सखोल माहिती घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article