महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा डंका केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या सीमा ओलांडून बांग्लादेशातही वाजू लागलाय. मुंबईत एका बांग्लादेशी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असल्याचे समोर आलंय. धक्कादायक म्हणजे गेल्या वेळी वेळ नव्हता म्हणून आधार लिंक झाले नाहीत अशी मोठी कबुली अजित पवारांनी दिली.
मुंबईत लाडकी बहीण योजनेची लाभार्थी एक बांग्लादेशी महिला निघाल्याचे समोर आले आहे. एका बांग्लादेशी महिलेच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे गेल्याची माहिती उघड झालीय. याप्रकरणी मुंबईतील कामाठीपुरा येथून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बनावट कागदपत्र जमा केल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना अजित पवार यांनी मोठी कबुली दिली. दादांच्या कबुलीमुळे निवडणुकीच्या तोंडावर घाईत लाडक्या बहिणी बनवल्या गेल्यात का? या प्रश्नाला जागा करून दिली. मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांचं काँग्रेसवर खापर फोडताय. दरम्यान, निकष बाह्य आणि अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार की नाही? यावरून राज्याच्या बाल विकास मंत्री आदिती तटकरेच संभ्रमात आहेत. त्यांचीच रोज वेगवेगळी विधानं येतात आणि योजनेबाबत संभ्रम पसरवली जात असल्याचा आरोप करताय. जर आधार कार्ड लिंक नसताना सरकारी पैसा दिला गेला तर याला जबाबदार कोण? कागदपत्र तपासण्याविनाच लाडक्या बहिणी बनवल्या तर यात दोष कुणाचा? अजित पवार म्हणतात वेळ कमी होता, म्हणजे घाई कशाची होती? सरकारची फसवणूक जर दोन्हीकडून झाली असेल तर कारवाई एकावरच होणार का? या प्रश्नांची उत्तर सरकारने देणे गरजेचे आहे. बघा काय म्हणाल्या आदिती तटकरे?
Published on: Jan 24, 2025 12:14 PM