परभणी/गंगाखेड(Parbhani) :- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात (hospital) गुरुवार २३ जानेवारी रोजी आयोजीत वाचा दोष निवारण शस्त्रक्रिया(Surgery) शिबिरात २२ विद्यार्थ्यांवर वाचा दोष शस्त्रक्रिया करण्यात आली.
५ ते १६ वर्षा पर्यंतच्या २२ विद्यार्थ्यांवर वाचा दोष निवारण शस्त्रक्रिया
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमवार यांच्या सूचनेनुसार व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या समन्वयक श्रीमती मीनाक्षी पद्मे, गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार २३ जानेवारी रोजी आयोजीत वाचा दोष निवारण शस्त्रक्रिया शिबिरात कान, नाक, घसा तज्ञ डॉ. तेजस तांबोळी यांनी राणीसावरगाव, बोर्डा, पिंपळदरी, सुप्पा, अरबूजवाडी, बडवणी, गंगाखेड, मालेवाडी, इसाद, झोला, मरडसगाव, रोकडेवाडी आदी गावांतील ५ ते १६ वर्षा पर्यंतच्या २२ विद्यार्थ्यांवर वाचा दोष निवारण शस्त्रक्रिया करून विद्यार्थ्यांच्या बोलण्यातील अडथळा दूर केला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे अधिकारी पथक प्रमुख डॉ. कैलास चांदकर, डॉ. योगेश मल्लुरवार, औषधी निर्माण अधिकारी राजकुमार फड, परिचारिका श्रीमती प्रेमलता खुर्दे, श्रीमती उषा कलटले, श्रीमती माला घोबाळे, श्रीमती सुमेधा नागरगोजे, प्रशांत राठोड, दिपक शिसोदे, संजय भदर्गे आदींसह उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.