धुळे : गेल्या वर्षभरात झालेल्या लोकसभा, विधान परिषद व विधानसभा निवडणुका सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उत्तम समन्वयामुळे निर्भय, भयमुक्त, नि:पक्ष वातावरणात पार पाडल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीतही या सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधुन शुक्रवारी (दि.२४) जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्ता अमिता दगडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, संजय बागडे, चंद्रशेखर देशमुख, महादेव खेडकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, मनपा उपायुक्त श्री.बाविस्कर, राज्य उत्पादन शुल्काच्या अधिक्षक स्वाती काकडे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी महेश खडसे, अपर तहसिलदार वैशाली हिंगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे, तहसिलदार प्रविण चव्हाणके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले, मागील वर्षभरात झालेल्या लोकसभा, विधान परिषद व विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यालय प्रमुखासोबतच त्यांच्यासोबत काम करणारे कर्मचारी यांनीही अतिशय चांगल्या प्रकारे काम केले. त्यांच्या उत्तम सहकार्यामुळेच निवडणूका निर्भय, भयमुक्त, नि:पक्ष वातावरणात पार पाडल्या. यात सर्वांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन केले.
आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीतही सर्वांनी समन्वयाने काम करुन निवडणुका यशस्वीपणे पार पाडाव्यात. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधुन सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली. प्रारंभी गतवर्षांत झालेल्या निवडणुकीत उत्कृष्ठ कामे केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपजिल्हा निवडणुक अधिकारी तळपाडे यांनी मानले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक स्वाती काकडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वराजंली पिंगळे, तहसिदार प्रविण चव्हाणके, नायब तहसिलदार प्रविण बागुल, सहायक महसुल अधिकारी कैलास जंघाळे, महसुल सहायक सागर पाटील, संगणक परिचालक चेतन बाविस्कर, हर्षल सोनवणे, शिपाई बाबु कोठुळे, गणेश माळी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.