टेंभुर्णी : वाळू तस्करीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कुर्डुवाडी येथील प्रांताधिकारी यांच्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक तीन आरोपींना २८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.तसेच अनोळखी आणखी तीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते फरार आहेत.
आण्णा दिगंबर पाटील रा.शिराळ (टें) ता.माढा, आप्पा पराडे रा.बाभळगाव,ता.माळशिरस, टिपर चालक गणेश काशीद रा.पतितेवाडी ता.माढा अशी पोलीस कोठडी सुनावलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात ॲट्रॉसिटीचे कलम वाढल्यामुळे टेंभुर्णी पोलिसाकडील तपास काढून तो डीवायएसपी अजित पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
वाळू तस्करी संबधी कारवाई करीत असताना आरोपिंनी प्रांत अधिकारी प्रियांका आंबेकर यांना हुज्जत घालुन अंगावर धावून येत धक्का-बुक्की केली होती. या घटनेचा अधिक तपास करमाळा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील हे अधिक तपास करीत आहेत.