80 टक्के समाजकरण आणि 20 टक्के राजकारण ही शिकवण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना दिली. विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांच्या कुरार गाव येथील संपर्क कार्यालयामधून अंध, अपंग, निराधार, मूकबधिर, विधवा महिलांना महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी योजनेतून आर्थिक सहाय्य देण्याबाबत मार्गदर्शन आणि मदत उपलब्ध करून देण्यात आली.
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील सर्व शाखांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून शिवसेनाप्रमुखांची जयंती दरवर्षी मोठय़ा जल्लोषात साजरी करण्यात आली. विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांनी शुक्रवारी दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील ज्या अंध, अपंग, परित्यक्ता, निराधार, मूकबधिर, विधवा महिला नागरिकांना या महिन्यापासून संजय गांधी योजनेचा लाभ प्राप्त झाला अशा नागरिकांना महाराष्ट्र शासनाचे आदेशपत्र, पेन्शन ओळखपत्र आणि प्रमाणपत्र, गुलाबाचे फुल आणि ब्लँकेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक रिना सुर्वे, उपविभागप्रमुख सुनील गुजर, शाखाप्रमुख अशोक राणे, मनोहर राणे, कृष्णा सुर्वे, अक्षता पांचाळ, प्रमोद चव्हाण, सुशांत पांचाळ, सुशांत पारकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. सर्व पेन्शनधारकांनी पेन्शन सुरू करून दिल्याबद्दल आमदार सुनील प्रभू यांचे आभार मानले.