अर्थवृत्त – शेअर बाजारात चढ-उतार

1 day ago 2

शेअर बाजाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. आज सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसोबत बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या शेअर्समध्ये सर्वात जास्त खरेदी-विक्री पाहायला मिळाली. रियल्टी, तेल, गॅस आणि फार्माच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसली. एनर्जी, ऑटो आणि पीएसई इंडेक्ससुद्धा घसरणीसोबत बंद झाले, तर एफएमसीजी, आयटी इंडेक्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स घसरून बंद झाले. निफ्टीतील 50 पैकी 32 स्टॉल घसरले. आज दिवसभरात सेन्सेक्स 330 अंक घसरणीसोबत 76,190 अंकांवर बंद झाला, तर निफ्टीतही 113 अंकांची घसरण होऊन 23,092 अंकांवर बंद झाला. निफ्टीतील एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण झाली. श्रीराम फायनान्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, टाटा पंज्युमर, डॉ. रेड्डीज, ट्रेंटच्या शेअर्समध्ये घसरण झाली. बीएसई सेन्सेक्सने गुरुवारी 115 अंकांच्या वाढीसोबत 76,520 अंकांवर बंद झाला, तर निफ्टीत 50 अंकांच्या वाढीसोबत 23,205 अंकांवर बंद झाला होता.

आठवडय़ातील बाजार

या आठवडय़ात तीन वेळा बाजार घसरणीसोबत बंद झाला. गेल्या तीन महिन्यांत पहिल्यांदा तीन वेळा लागोपाठ शेअर बाजार घसरणीसोबत बंद झाला. बॉर्डर मार्पेटवर सर्वाधिक प्रभाव दिसला. या आठवडय़ात मिडकॅप इंडेक्स 2 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स 4 टक्के घसरले. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अर्ध्या टक्क्याची घसरण झाली.

कचऱ्यापासून रस्ता

अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेडतर्फे कांजूरमार्ग येथे ‘एंड-ऑफ-लाईफ’ प्लॅस्टिक कचऱ्यापासून टिकाऊ बिटुमेन रस्ता बांधणी करण्यात आली. रस्त्यासाठी प्रक्रिया पेंद्रातून निर्माण होणाऱया प्लॅस्टिकच्या कचऱयाचा वापर करण्यात आला.

सामंजस्य करार

ग्लोबल रिस्क मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट आणि मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेन्युअरशिप अँड प्रोफेशनल स्किल्स काwन्सिल यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱया केल्या. या वेळी कर्नल अनिल कुमार पोखरियाल आणि सीईओ सुभाषिस नाथ उपस्थित होते.

जीनियस स्पर्धा

चेन्नई येथे झालेल्या बहुप्रतीक्षित एसआयपी अंकगणित जीनियस स्पर्धा ग्रँड नॅशनल फायनल्समध्ये एसआयपी अकादमी इंडियाने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या 9 व्या आवृत्तीत 23 राज्यांमधील 1,500 शाळांमधील सात लाख 50 हजारांहून अधिक मुलांनी सहभाग घेतला.

एनएचसी फूड्स

एनएचसी फुड्स लिमिटेडने 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिसऱया तिमाहीचे आणि नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 384 टक्क्यांनी वाढून 208.33 लाख रुपयांवर पोहोचला आहे.

विद्यार्थ्यांसाठी जीतचा शुभारंभ

रामकृष्ण शारदा समिती आणि स्टेट बँक ऑफ इंडिया फाऊंडेशनद्वारे आजीवन मोफत लार्ंनग मॅनेजमेंट सिस्टिम जीत (JEET) चा शुभारंभ मुंबईत करण्यात आला. जीत देशातील सहा राज्यांमधल्या 10 हजारांहून अधिक सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीचा कन्टेन्ट पुरविणार आहे. वेबआधारित एलएमएस मंचाच्या मदतीने आर्थिकदृष्टय़ा वंचित गटातील 10 लाख विद्यार्थ्यांना सेवा पुरविण्याचे लक्ष्य जीतने आखले असून या सेवेद्वारे या विद्यार्थ्यांना आजन्म मोफत शैक्षणिक मंच पुरविला जाणार आहे. या वेळी आरकेएसएसचे संचालक रघू पिलाका एसबीआय फाऊंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर संजय प्रकाश उपस्थित होते.

रिलायन्स डिजिटलचा इलेक्ट्रॉनिक्स सेल

रिलायन्स डिजिटलचा इलेक्ट्रॉनिक्स सेल आला आहे. या सेलचे नाव डिजिटल इंडिया सेल आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंवर मोठा डिस्काउंट मिळणार आहे. बँकांच्या कार्ड्सवर केलेल्या खरेदीवर 26 हजारांपर्यंत तात्काळ सूट मिळेल. ही ऑफर रिलायन्स डिजिटल आणि माय जिओ स्टोअर्सवर उपलब्ध आहे. यूपीआय वारणाऱया यूजर्सला 1 हजारांपर्यंत सूट मिळेल. हा डिजिटल इंडिया सेल 26 जानेवारी 2025 पर्यंत लाईव्ह आहे. या सेलमध्ये फोन, लॅपटॉप, एसी, स्पीकर, इअरबड्स, फ्रीजवर घसघशीत सुट मिळणार आहे. कोणतेही प्रोडक्ट खरेदी केल्यावर 5 ते 15 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकणार आहे.

इंडियामार्टच्या महसुलात 16 टक्क्यांनी वाढ

इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेडने आर्थिक वर्ष 2025 मधील तिसऱया त्रैमासिकाचे निकाल जाहीर केले असून त्यात 16 टक्के महसूल वाढ झाल्याचे दिसून आले आहे. इंडियामार्टने मागील वर्षाचा या त्रैमासिकामध्ये 305 कोटींचा कार्यकारी संकलित महसुलाच्या तुलनेत यंदा 354 कोटींचा महसूल मिळविला. इंडियामार्टचा एकल महसूल हा 337 कोटींचा आहे आणि बिझी इन्पह्टेकचा महसूल 16 कोटींचा आहे.

पारस डिफेन्सकडून 12 हजार कोटींची गुंतवणूक

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड (पारस डिफेन्स) हे संरक्षण आणि अंतराळासाठी ऑप्टिक्स व ऑप्ट्रॉनिक प्रणालींमध्ये अग्रेसर असून त्यांच्याकडून महाराष्ट्रात भारतातील पहिले ऑप्टिक्स पार्क उभारण्यासाठी 12 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यासंदर्भात संरक्षण कंपनीने महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार (एमओयू) केला.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा वर्धापन दिन

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने 8 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात 15 बँक शाखांचे उद्घाटन केले. 8 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील 1043 शाखांच्या मजबूत जाळ्याबरोबरच आर्थिक समावेशनासाठी घेतलेल्या वचनबद्धतेचा आलेख उंचावला आहे. या वेळी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद सिंह उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article