आयसीसीने ‘सर्वोत्तम एकदिवसीय संघा’ची घोषणा करताना हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आयसीसीने 2024 या वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश या संघात केला आहे. मात्र हिंदुस्थानचा संघ केवळ तीनच सामने खेळला असल्यामुळे एकाही हिंदुस्थानी खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही.
आयसीसीने निवडलेल्या या संघात पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीजच्या खेळाडूंचा समावेश आहे, मात्र हिंदुस्थानातील एकही खेळाडू नसल्याने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
आयसीसी सर्वोत्तम एकदिवसीय संघ
सईम अयूब, रहमानुल्लाह गुरबाज, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरिथ असलंका, शेरफेन रुदरफोर्ड, अझमतुल्लाह उमरझई, वानिंदु हसरंगा, शाहिन शाह आफ्रिदी, हारिस रऊफ, अल्लाह गजनफर.
आयसीसीचा सर्वोत्तम कसोटी संघ
यशस्वी जैसवाल, बेन डकेट, केन विल्यम्सन, जो रुट, हॅरी ब्रुक, कामिंदु मेंडिस, जॅमी स्मिथ (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, पॅट कमिन्स (कर्णधार), मॅट हेन्री, जसप्रीत बुमरा.