पुढारी ऑनलाईन डेस्कः अमूलने आपल्या १ लिटर दूध पॅकिंगची किंमत १ रुपयांनी स्वस्त केली आहे. या अमूल गोल्ड दुधाच्या एक लिटरच्या पिशवीला ६८ रुपये मोजावे लागत होते. आता याची किंमत ६७ रुपये झाली आहे. अमूल ताजा आता ५६ ऐवजी ५५ रुपयांना मिळणार आहे. अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेश या उत्पादनांच्या किमतीही कमी झाल्या आहेत.
गुजरात कोओपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन आपली उत्पादने ‘अमूल’ या नावाने विक्री करत असते. त्यांनी आपल्या १ लिटर दूधाच्या पॅकिंगची किंमत १ रुपयांनी कमी केली आहे. देशभरात ही लागू केली जाईल.
अमूल दूध चे कार्यकारी संचालक जयेन मेहता यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. ग्राहकांनी दूध घेताना मोठे पॅकिंग घ्यावे व त्यांचा लाभ व्हावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याचेही मेहता यांनी स्पष्ट केले.
गुजरात कोओपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा २०२३ - २४ यावर्षीचा टर्नओहर ५९,४४५ कोटी झाला आहे. तसेच अशाच पद्धतीने विक्री राहिल्या आमच्या महसूलात दुपटीने वाढ होईल असे मेहता यांनी सांगितले. अमूल तर्फे गेल्यावर्षी सरासरी दररोज ३१० लाख लिटर दूधाचे संकलन व वितरण केले गेले. तर त्यांची एकूण दूध प्रोसेसिंगची क्षमता ही ५०० लाख लिटरची आहे.
गुजरात कोओपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन चे ३६ लाख सभासद आहेत. गुजरातमधील १८,६०० गावातून दूध संकलन केले जाते. जवळपास दररोज येथून ३०० लाख लिटर दररोज संकलन केले जाते. या संस्थेच्या अमूल ब्रँडची उत्पादने जगभरातील ५० हजार देशांमध्ये पोहचली आहेत.