Published on
:
24 Jan 2025, 11:09 am
Updated on
:
24 Jan 2025, 11:09 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : रणजी ट्रॉफी 2024-24 च्या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या सौराष्ट्र संघाने ऋषभ पंतच्या दिल्ली संघाला फक्त 3.1 षटकांत म्हणजेच 19 चेंडूंत 10 गडी राखून पराभूत केले. सामन्याचा हिरो स्वतः रवींद्र जडेजा ठरला. त्याने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात ऋषभ पंतसह एकूण 7 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे त्याने 12 विकेट्स घेत दिल्लीला लोटांगण घालण्यास भाग पाडले.