कोल्ड स्टोरेज सुविधा नसल्याने मच्छीविक्रेते त्रस्त आहेत.
Published on
:
24 Jan 2025, 5:03 pm
Updated on
:
24 Jan 2025, 5:03 pm
वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरात अद्ययावत सागररत्न मत्स्य बाजारपेठ बांधण्यात आले असून ते सुसज्ज मार्केट आहे, असा गाजावाजा केला गेला. परंतु येथे सद्यस्थितीत कोल्ड स्टोरेज सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध नसल्याने मच्छीविक्रेत्या महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष व शिवसेना जिल्हा संघटक सुनील डूबळे यांनी वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची भेट घेऊन लक्ष वेधले.
दरम्यान कोल्ड स्टोरेज सुविधा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले. तर मच्छीविक्रेत्या महिलांच्या इतर समस्या सोडविण्याबाबत त्वरित उपाययोजना करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. यावेळी मच्छीमार महिलांना कोल्ड स्टोरेज सुविधा प्राधान्याने उपलब्ध व्हावी, मच्छीविक्रेत्या महिलांना विद्युत पुरवठा सुरळीत सुरू राहावा, परिसरात रेलिंग व्यवस्था व्हावी, येथील परिसर स्वच्छता आदी विषयांबाबत डूबळे यांनी सीईओ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.