कोरची(Gadchiroli):- कोरची येथे केपीएल सिजन दोनच्या रात्र कालीन क्रिकेट (Cricket) स्पर्धेचं खेळांचा थरार कोरची तालुक्यातील क्रिकेट प्रेमींनी १२ दिवस अनुभवला. या रात्रकालीन क्रिकेट सामन्यांमध्ये विविध आठ संघांचे एकूण ३२ सामने लगाण मैदानात खेळण्यात आले. यामध्ये प्रथम कोरची पँथर संघ तर द्वितीय पॉवर फायटर संघ आणि तृतीय हर्ष जॉईंट यांनी बाजी मारली आहे. शिवाय मॅन ऑफ द सिरीज मध्ये उत्कृष्ट खेळाडूला चषक देऊन गौरवीन्यात आले आहे.
प्रथम विजेता कोरची पँथर तर उपविजेता पॉवर फायटर
विजेता कोरची पँथर संघाला मंगळवारी रात्री चषक आणि एक लाख रोख तर द्वितीय पॉवर फायटर संघाला चषक व ६० हजार रोख आणि तृतीय हर्ष जॉईंट संघाला चषक व ४० हजार रोख बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सदरुद्दीन भामानी, जिल्हा भाजप सदस्य कमलनारायण खंडेलवाल, भाजप तालुका अध्यक्ष नसरुद्दीन भामानी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विनोद मडावी, प्राचार्य नंदू गोबाडे, डॉ मुरलीधर रुखमोडे, मुख्याध्यापक हरिश्चंद्र मडावी, एपीआय मुकुंद देशमुख, पीएसआय प्रवीण बुंदे, योगेश पवार, पत्रकार राहुल अंबादे, सूरज हेमके, डॉ शुभम वयाळ, डॉ स्वप्नील राऊत यासह प्रतिष्ठित व्यापारी नागरिक उपस्थित होते.
कोरची पँथर संघाला मंगळवारी रात्री चषक आणि एक लाख रोख
१० जानेवारी पासून सामन्याची सुरुवात झाली. यामध्ये पहिला सामना अंकित इलेव्हन विरुद्ध रेड रोज संघात रंगला या सामन्याला बघण्यासाठी तालुक्यातील शेकडो नागरिक रात्री उपस्थित होते. पहिला सेमी फायनल(Semi Finals) सामन्यात पॉवर फायटर संघा विरुद्ध हर्ष जॉइन्ट संघरामध्ये सामना रंगला यामध्ये पॉवर फायटर संघ विजयी होऊन अंतिम सामन्यात प्रवेश केला. दुसरा सेमी फायनल सामन्यात कोरची पँथर संघ विरुद्ध रेड रोज संघामध्ये कोरची पँथर संघ बाजी मारून अंतिम सामन्यात प्रवेश केला. फायनल सामना मंगळवारी २१ जानेवारी रोजी रात्री कोरची पँथर संघा विरुद्ध पॉवर फायटर संघाशी सुरू झाली यामध्ये पॉवर फायटर संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचे निर्णय घेतला व फलंदाजी करण्याचे आव्हान कोरची पँथर संघ यांना दिले. या सामन्यात कोरची पँथर संघाने आठ ओव्हर मध्ये ६४ रन काढुन पावर फायटर संघाल ६५ धावांचा लक्ष दिला परंतु ५१ धावांमध्ये ओव्हर समाप्ती होऊन कोरची पँथर संघ विजेता झाला.
या केपीएल स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत आयोजक समितीचे, नसरुद्दीन भामानी, किशोर ढवळे, डॉ.स्वप्निल राऊत, घनश्याम अग्रवाल, नितीन रहेजा, विशाल हाडगे, स्वप्निल कराडे, चेतन कराडे, प्रशांत कराडे, छत्रपती बांगरे, सदस्य होते यावेळी आयोजकांनी, ऑनलाइन यूट्यूब वर लाईव्ह क्रिकेट, प्रेक्षकांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सह अंतिम क्रिकेट सामन्यामध्ये डीजेची व्यवस्था केली होती तालुक्यातील असंख्य नागरिकांनी याचा भर भरून आनंद घेतला.