Akola (Patur):- पातुर तालुक्यातील सावरखेड जंगलामध्ये पैशाचा पाऊस पाडण्याकरिता वाशिम जिल्ह्यातील कारंजा , पातुर शहरातील व बार्शिटाकळी तालुक्यातील १२ ते १४ जण गुरुवारी रात्री सावरखेड जंगलात जमले होते. परंतू गोधन चोरणारी टोळी गावात आल्याच्या संशयाने गावकऱ्यांनी विचारणा केली असता घटनास्थळावरून या आघोरीवृत्त करणाऱ्या 12 ते १४ जणांनी पळ काढला. यातील चौघेजण हे व्हॅगनार क्रमांक एम एच ३० टी ६४५४ या गाडीतून जात असताना गाडी पलटी झाली व त्यातून ४ नी पळ काढून जंगला च्या दिशेने पळत सुटले असता एका जणांचा खोल दरीत पडून मृत्यू (Death) झाल्याची घटना गुरुवारी रात्री दोन ते चार च्या दरम्यान घडली असून याप्रकरणी पातुर पोलीस सखोल चौकशी करत आहे.
ग्रामस्थांच्या भीतीने पळ काढल्याने एकाचा दरीत पडून मृत्यू
गुरुवारी रात्री वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील चार ते पाच जण पातूर शहरातील तीन जण व अकोल्यातील काहीजण बार्शी टाकळी तालुक्यातील एक डाक्टर सावरखेड जंगलामध्ये जमा झाले. रात्री दहाच्या दहा ते बाराच्या दरम्यान हे सर्व सावरखेड जंगला पैशाचा पाऊस पाडण्याकरिता जमा झाले होते अशी माहिती आहे. पैशाचा पाऊस पाडण्याकरता आवश्यक असणाऱ्या पूजेच्या साहित्या करता यांनी पैसे सुद्धा जमा केले असल्याचे माहिती आहे. यानंतर गावाच्या जवळ बाहेरील अज्ञात व्यक्ती वाहनासह जमा झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. गावात बोधन चोरणारी थोडी सावरखेड गावांमध्ये येत असल्याचा संशय सावरखेड वासियांना आला त्यानंतर सावरखेड पैशाचा पाऊस पडणार आहे.
अज्ञात व्यक्ती वाहनासह जमा झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली
घटनास्थळावर जमा झाल्यानंतर घटनास्थळावरील सर्व जणांनी पळ काढला यातील एक गाडी व्हॅगनार मध्ये चार जण बसून त्यांनी सावरखेड जंगलामध्ये पळत जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला ग्रामस्थांचा रोष पाहून अपघातग्रस्त गाडीतून चार जणांनी बाहेर निघून जंगलाच्या दिशेने पळत निघाले पळत असताना यातील दोघेजण हे खोल दरीच्या भागात पळत गेले. रात्रीचा अंधार व जागेची माहिती नसल्याने या दोघांपैकी मृतक रहमान खान आमिर खान वय 40 हा 50 ते 60 फूट खोल दरीत पडला व यामध्ये त्याचा मुत्यु झाला. घटनेची माहिती पातुर पोलिसांना मिळतात पातूर पोलीस स्टेशन (Police station) घटनास्थळावर दाखल झाले व खोल दरीत पडलेल्या मृतख रहमान खान हमीद खान याला बाहेर काढून अकोला येथे उपचाराकरता पाठविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनास्थळावरून 12 ते 14 जण पळून गेले असल्याने माहिती असून पातूर पोलीस यांचा शोध घेत आहे यामध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील एका डॉक्टरचा सुद्धा समावेश असल्याची माहिती असून एक महिला असल्याचे माहीत आहे.
पैशाचा पाऊस पडण्यार्या टोळी नेहमी येत असल्याची सुद्धा चर्चा
पातुर तालुक्यातील जंगलामध्ये गुप्तधन व पैशाचा पाऊस पडण्यार्या टोळी नेहमी येत असल्याची सुद्धा चर्चा आहे. पातूर तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली झाली असून पातूर पोलीस या सर्व घटनेची कसुन शोध घेत आहे. पलटी झालेली व्हॅगनार एमएच ३० जी ६४५४ ही जळलेल्या अवस्थेत असल्याने ही जाळून टाकली का अपघातामध्ये शॉर्टसर्किटेकडून (Short-circuit) आग लागली याचा सुद्धा शोध पातूर पोलीस घेत आहे