एसटीचा प्रवास आजपासून झाला महाग:14.95% ची भाडेवाड लागू झाल्याची राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

4 hours ago 1
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाडीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून एसटीची भाडेवाढ लागू झाल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. या भाडेवाडीमुळे गोरगरीब प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार हे निश्चित झाले आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) नुकत्याच झालेल्या एका बैठकीत तिकीटात 14.95% ची दरवाढ करण्याचा प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार, या दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. रिक्षा व टॅक्सीच्या भाडेवाडीविषयीही निर्णय झाला आहे. पण त्याविषयी अद्याप स्पष्टपणे सांगण्यात आले नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मंत्रालयात नुकतीच प्राधिकरणाची गुरुवारी बैठक पार पडली. त्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो. केवळ गृह व अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांचा यात समावेश असतो. या बैठकीत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या एसटी दरवाढीचा निर्णय हातावेगळा करण्यात आला. ही दरवाढ 14.95 टक्के एवढी असेल. रिक्षा व टॅक्सी यांची दरवाढ ही 1 फेब्रुवारीपासून लागू असेल. या प्रकरणी 3 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. गतकाही वर्षांत डिझेल, सीएनजी, एसटीचे सुटे पार्ट आदी गोष्टींमध्ये प्रचंड दरवाढ झाली आहे. त्यामुळे दरवर्षी ही दरवाढ अपेक्षित असते. पण मागील 3 वर्षांपासून ही दरवाढ झाली नव्हती, अशी पुस्तीही सरनाईक यांनी यावेळी या दरवाढीचे समर्थन करताना जोडली. सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला पोहोचणार झळ एसटी महामंडळाने आपल्या प्रस्तावात 14.95 टक्के भाडेवाड करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तर ऑटोरिक्षा व टॅक्सी भाडे संघटनांनी मुंबईत 3 रुपयांनी दरवाढ करण्याची मागणी केली होती. या दरवाढीमुळे ऑटोरिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपयांवरून 31 रुपये होऊ शकते. टॅक्सी व ऑटोसाठी शेवटची भाडेवाड ऑक्टोबर 2022 मध्ये करण्यात आली होती. एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे वाढीव दर, सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती आदी कारणांमुळे ही ही भाडेवाड करणे गरजचे असल्याचे सांगत एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने भाडेवाढीला मंजुरी दिली होती. हे ही वाचा... पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांत वाढ:राज्यातील रुग्णसंख्या 67 वर; 13 व्हेंटिलेटरवर, 24 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू पुणे - राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. सद्यस्थितीत हा आकडा 67 वर पोहोचला असून, त्यापैकी 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 24 जणांवर आयसीयू अर्थात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सदर रुग्ण आढळलेल्या परिसरातील इतर रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने सर्वेक्षण सुरू केले आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article