अनेक जणांना अशी अशा असते की, काही तरी चत्मकार घडावा आणि आपण श्रीमंत बनावं, पैशांचं घबाड आपल्या हाती लागाव. त्यासाठी काही लोक लॉटरीची मदत घेतात. लॉटरीच्या माध्यमातून आपलं नशीब अजमावून पाहातात. तर काहीजण मेटल डिटेक्टर घेऊन वर्षानुवर्ष बंद पडलेल्या प्राचीन घरांमध्ये जाऊन गुप्त धनाचा शोध घेत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या एका खंडर सदृश्य दिसणाऱ्या घरात एक व्यक्ती हातात मेटल डिटेक्टर घेऊन भीत -भीत आता घुसला.भितींवर हात ठेवताच या तरुणाचं नशीब बदललं. त्याला आश्चर्याचा मोठा धक्का बसला.
भिंतीमध्ये दडून ठेवलेला खजाना त्याच्या हाती लागला. ज्याची कल्पनाही कधी या तरुणानं केली नव्हती. हा तरुण त्या घरात घुसला. मेटल डिटेक्टरच्या मदतीनं शोध घेत असताना त्यांचं नशीब चमकलं. त्याला त्या भिंतीमध्ये लपवून ठेवलेलं गुप्त धन सापडलं. या तरुणाला आश्चर्याचा धक्का बसला. अशी घटना लाखो लोकांमधून एखाद्यासोबतच होऊ शकते. तरुणासोबत देखील काहीसा असाच प्रकार घडला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता. हा तरुण भीत-भीत त्या जुन्या घरात शिरला. मेटल डिटेक्टर घेऊन सोनं शोधत असताना तो त्या घरात लावलेल्या एका पिलर जवळ पोहोचला. तिथे त्याच्या मेटल डिटेक्टरमधून बीपबीप आवाज आला. तीथे त्याने शोध घेतला असता त्याच्या हाती खजाना लागला आहे, समोरचं दृष्य पाहून या तरुणाला एवढा धक्का बसला की, त्याच्या तोंडून शब्द देखील फुटला नाही.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जेव्हा मेटल डिटेक्टरमधून बीप-पीब असा आवाज आला, तेव्हा त्या तरुणानं तो पिलर तोडला. त्या पिलरमध्ये त्याला धातुचा एका पॉट सापडला आहे, जो पॉट डॉलरने भरलेला आहे. यासोबतच या पॉटमध्ये सोनं देखील होतं. हा तरुण मालामाल झाला आहे. हा व्हिडीओ @jackcharlesefaisca या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
सध्या जो व्हिडीओ व्हायर होत आहे, त्यावर विश्वास करणं अवघड आहे, मात्र काहीही घडू शकतं. काही लोकांनी या व्हिडीओबाबत शंका उपस्थित केली आहे. व्हिडीओ साठी हे सर्व तयार करण्यात आलं,असं काही लोकांनी म्हटलं आहे.तर काही लोकांनी नशीब असावं तर असं अशी कमेंट हा व्हिडीओ पाहिल्यानंतर केली आहे.