शैक्षणिक धोरण बहुआयामी- डॉ. मोताळे:म्हसदीच्या देवरे महाविद्यालयातर्फे स्कूल कनेक्ट कार्यशाळा
3 hours ago
2
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे बहुआयामी असून, या धोरणांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यवृद्धी, रोजगार क्षमता, उद्योगशीलता, संशोधक वृत्ती आणि व्यवसायाभिमुखता वाढवण्यास मदत होईल, असे प्रतिपादन स्व. अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. बाबासाहेब मोताळे यांनी केले. राज्य शासन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि आदिशक्ती धनदाई माता शिक्षण प्रसारक संस्थेचे अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे सी. डी. देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत स्कूल कनेक्ट अभियानातून कार्यशाळा झाली. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सी. डी. देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. ए. देवरे होते. म्हसदी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. वाल्मीक आढावे उपस्थित होत्या. डॉ. मोताळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्ट, वैशिष्ट्ये, संरचना तसेच या धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांसह स्वयम, महास्वयम, साथी, विद्यालक्ष्मी आदी शैक्षणिक योजनाविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक एस. ए. देवरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात होऊ घातलेल्या बदलांची माहिती दिली. प्रा. डॉ. वाल्मीक आढावे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेत नववी ते बारावीचे १७५ विद्यार्थी सहभागी झाले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. संजय सूर्यवंशी यांनी केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)