Apple च्या वॉचमध्ये धोकादायक रसायन असल्याचा आरोप, कर्करोग होण्याची भिती!

3 hours ago 1

स्मार्टवॉचबाबत तरुणामध्ये प्रचंड क्रेझ असून कंपन्या सतत एकामागून एक स्मार्टवॉच बाजारात आणत आहेत. मात्र फिटनेस वॉचबाबत एक धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. Appleचे वॉच वापरणाऱ्यांसाठी ही बातमी आहे. एका अहवालानुसार फिटनेसवर नजर ठेवण्यासाठी Appleचे वॉच वापरले जाते मात्र त्याच्या बॅण्डने कॅन्सरचा धोका होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. Apple वर Apple वॉच बँड विकल्याचा आरोप आहे ज्यात PFAS म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हानिकारक रसायनचा वापर केला गेला आहे.

द रजिस्टरनुसार, कॅलिफोर्नियाच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्टमध्ये नुकत्याच दाखल केलेल्या एका खटल्यात Apple वर स्पोर्ट बँड, ओशन बँड आणि नायकी स्पोर्ट बँड या तीन प्रकारच्या बँडमध्ये धोकादायक रसायन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.खरंतर, स्पोर्ट बॅण्ड हा बेसिक मॉडल Apple वॉच सोबत येतो. ओशन आणि नायकी स्पोर्ट बॅण्ड हा नायकी ब्रॅण्डेड Apple वॉच सोबत येतो. Appleने तिन्ही बॅण्ड हे फ्लोरोएलास्टोमर हे रसायन वापरुन बनवले आहे. ज्यामुळे खटल्यात आरोप करण्यात आला आहे की, पेर आणि फ्लोरोएल्काइल हे त्या वस्तूतील PFAS हे धोकादायक रसायन लपवते. पीएफएएस हे रसायन ग्राहक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. या रसायनांमुळे कर्करोगाचा धोका, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती आणि गर्भातील बाळाला संभाव्य धोकाही होऊ शकतो. याला फॉरएवर रसायनाच्या रुपाने ओळखले जाते .

हे रसायन अत्यंत धोकादायक असून ते बॅण्डच्या माध्यमातून त्वचेच्या दीर्घकाळ संपर्कात येते आणि घाम आणि छिद्रांद्वारे रसायन शरीरात प्रवेश करू शकते. खटल्यात नॉट्रे डेम विद्यापीठाने केलेल्या 2024 चा अभ्यासाचा हवाला दिला आहे, ज्यामध्ये Appleसह अनेक स्मार्टवॉच बँडमध्ये PFAS या धोकादायक रसायनाची उच्च पातळी आढळली. संशोधकांना काही बँडमध्ये परफ्लुओरोहेक्सानोइक अॅसिड (PFHxA) चे उच्च प्रमाण आढळले. 2022 पर्यंत आपल्या उत्पादनांमधून PFAS काढून टाकण्याची वचनबद्धता असूनही Appleने जाणूनबुजून हे बँड विकल्याचा दावा खटल्यात करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीवर फसवणूक, निष्काळजीपणा आणि कॅलिफोर्नियाच्या ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्यामुळे याचिकाकर्त्याने कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

PFAS या रसायनाबद्दल चिंता वाढत असताना ग्राहकांना सिलिकॉन किंवा PFAS-मुक्त बँड सारखे सुरक्षित पर्याय निवडण्याचे आवाहन केले जात आहे.Appleकडून या खटबाबत कोणतेही भाष्य समोर आलेले नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article