शिवना - टाकळी प्रकल्पाच्या उजव्या, डाव्या कालव्याला जागोजागी गळती:जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार; उन्हाळ्यात पाणी टंचाईचा धोका

3 hours ago 2
कन्नड तालुक्यातील शिवना - टाकळी प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे पाणी सुटून आठ दिवस झाले आहेत. जानेवारी महिन्यात डाव्या व उजव्या कालव्यातून हे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. देवगावचा डावा कालवा १२ किलोमीटर आहे, तरीही देवगावपर्यंत प्रकल्प झाला तेव्हापासून पाणी आतापर्यंत कधीही गेले नाही. वैजापूरकडे जाणारा उजवा कालवा जवळपास ५४ किलोमीटर आहे. परंतु १० ते १५ किलोमीटरच्या पुढे पाणी कधीही गेले नाही. जागोजागी पाण्याची प्रचंड गळती आहे. मुख्य कालव्याचे आरसीसी अस्तरीकरण झालेले नाही, पैसे मात्र निघालेले आहेत. प्रत्यक्ष शेती पिकाला पाणी कुठेही मिळत नाही. शेत पोटचारीचेही काम झालेले नाही, त्यामुळे दोन्ही कालव्याचे पाणी ओढ्या नाल्यात जात आहे. शिवना - टाकळी धरण जेमतेम पावणे दोन टीएमसी आहे. त्यात आता बोरसरपासून लासुर स्टेशनपर्यंत शिवना नदीच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचे ७/१२ व १००० रुपये वर्गणी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी घेतली जात आहे. जवळपास ३५ ते ४० छोटे मोठे केटीवेअर सिमेंट बंधारे आहेत. हे सगळे भरायचे ठरल्यास शिवना टाकळी प्रकल्प रिकामा होईल. शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाण्यावर व शेतकऱ्यांवर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तालुक्यातील कोणतेही पुढारी अथवा अधिकारी यांचे लक्ष नाही. जलसंपदा विभाग मनमानी कारभार करत आहे. यामुळे कुठल्याही नियम न पाळता पाणी सोडले जात आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक येथे न घेता परस्पर निर्णय घेऊन मनमानी कारभार सुरू आहे. या गंभीर प्रश्नाकडे तालुक्यातील कोणत्याही नेत्यांचे लक्ष नाही, अशी प्रतिक्रीया टाकळी लव्हाळी येथील शेतकरी प्रकाश आहेर यांनी दिली. डावा कालवा आज बंद करणार आम्ही वारंवार चाऱ्यांची पाहणी करत आहोत. अनेक ठिकाणी कालव्यात माती टाकून शेतकरी कालवा फोडत आहेत. यामुळे पुढे गेलेले पाणी पुन्हा परत येते. उजवा कालवा आठ दिवस अवर्तन चालू ठेवणार आहोत. डावा कालवा आवर्तन आज शुक्रवार रोजी बंद करणार आहे, अशी माहिती शिवना - टाकळी प्रकल्प उपअभियंता अश्फाक शेख यांनी दिली. पुरवठा योजना धोक्यात धरणाचे बॅकवॉटरच्या व लाभधारक शेतकऱ्यांनी जागृत होऊन नदीपात्रात पाणी सोडण्यास विचार करायला लावावा. नदीपात्रात पाणी सुटल्यास अवघ्या दहा ते पंधरा तासात धरण रिकामे होईल. त्यामुळे प्रकल्पावर आधारित कन्नड तालुक्यातील शेतकरी व पाणी पुरवठा योजना धोक्यात येईल. योजना राबविणाऱ्या ग्रामपंचायत यांनी गांभीर्याने विचार करावा व विभागाचा मनमानी कारभार थांबवावा, असे आवाहन प्रहार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रकाश आहेर सह शेतकऱ्यांनी केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article