लांबच्या पल्ल्यासाठी रेल्वे प्रवास म्हणजे सर्वांसाठीच सुखकर असतो. बरं आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांसाठी अनेक सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जसं की जेवण, चहा शिवाय एसी कोचमध्ये टॉवेल, बेडशीट सगळं काही पुरवलं जातं.
रेल्वेतील व्हिडीओमुळे बसेल धक्का
पण कधी कधी रेल्वेतील जेवणाबद्दल, जुने ब्लॅंकेट, टॉवेल न बदलल्याच्या तक्रारीही आल्या आहे. तसं पाहायला गेलं तर रेल्वेमध्ये सतत काहीना काहीतरी खायला आणि चहा-कॉफी तर येतच असते. आणि प्रवासात चहा-कॉफी ही आवर्जून घेण्याची इच्छा होते. पण कधी चहा-कॉफीबद्दल कोणती तक्रार आल्याचं फारसं ऐकलं नसेल.
पण सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे तुमचा रेल्वेप्रवासात येणाऱ्या चहा-कॉफीवरचं मन उडेल आणि धक्काही बसेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा कधी रेल्वे प्रवासाती चहा-कॉफी घेणारचं नाही.
प्रवासादरम्यान अनेकदा काही नवे आणि काही अनपेक्षित अनुभव अनेकांनाच येतात. पण, प्रत्येक वेळी हे अनुभव चांगलेच असतील असं नाही. अशाच काहीशा विचित्र अनुभवाचा किंबहुना एका किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये रेल्वेप्रवासादरम्यान दिल्या जाणाऱ्या चहासंदर्भातच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ‘
व्हिडीओ पाहून चहा प्यायचं सोडून द्याल…
एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये चहाविक्रेता रेल्वे कोचमध्ये चहा विकण्यासाठी आणणारी किटली चक्क शौचालयातील नळाच्या पाण्यानं धुवत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा प्रकार रेल्वेप्रवासात अगदी आवडीने आणि विश्वासाने चहा-कॉफी घेणाऱ्यांसाठी किती धक्कादायक असेल याचा विचारही आपण करू शकत नाही.प्रवाशांकडून
प्रवाशांकडून संताप
रेल्वेमध्ये सुरु असणारा हा घाणेरडा प्रकार पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारता त्याच सेवांच्या नावावर हा असा घाणेरडा प्रकार सुरू असेल तर याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे असं नेटकरी आणि रेल्वे प्रवाशांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ इतका किळसवाणा आहे की, चहाप्रेमींनाही रेल्वेप्रवासादरम्यान चहा पिताना आता मात्र नक्कीच विचार करावा लागेल.
रेल्वे प्रवासादरम्यान घडलेला हा प्रकार नवी बाब नसून, यापूर्वीसुद्धा अशा अनेक घटना समोर आल्यानं प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वे प्रशासनाचा कारभार यावर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे. प्रवाशांच्या आरोग्याच्या बाबतीत प्रशासन बेजबाबदार असल्याचं इथं स्पष्ट होत असल्यानं अनेकांनीच तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.