बॉलिवूड सेलिब्रिटीवरील अडचणी काही संपताना दिसत नाहीये. सैफवरील हल्ल्यानंतर अनेक सेलिब्रिटींना धमक्या आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आता आणखी दोन सेलिब्रिटींवर गदा आली आहे. सुप्रसिद्ध मराठी अन् बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि बॉलिवूड अभिनेते आलोकनाथ यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलं आहे.
श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्याविरुद्ध FIR
एका कंपनीमुळे या दोन स्टार्सवर हे संकट आलं आहे. हरियाणातील सोनीपतमध्ये ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एका कंपनीचे प्रमोशन करण महागात पडलं आहे. इंदूरमध्ये रजिस्टर करण्यात आलेल्या एका सोसायटीच्या 50 लाखांपेक्षा जास्त लोकांचे करोडो रुपये घेऊन पळणाऱ्या कंपनीचं प्रमोशन केल्याबदद्ल या दोन्ही अभिनेत्यांवर FIR दाखल करण्यात आली आहे.
अभिनेते प्रमोशन करत असलेली कंपनी फ्रॉड निघाली
श्रेयस आणि आलोकनाथ हे दोघे बॉलिवूड सेलिब्रिटी या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रमोशन करत होते. तर सोनू सूदनं देखील या कंपनीच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. पोलिसांकडे दाखल केलेल्या FIR मध्ये या कंपनीनं 6 वर्ष लोकांकडून पैसे जमा केले.
लोकांनी फिक्स्ड डिपॉजिट म्हणजे एफडी सोबत दुसऱ्या पद्धतीनं पैसे जमा करत मोठ्या प्रमाणात रिटर्न देण्याचं वचन दिलं. इतकंच नाही तर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी महागडे आणि मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनारही ठेवले आणि मल्टीलेवल मार्केटिंग केल्यानं पैसे मिळतील असं आमिशही दाखवलं.
असं म्हटलं जातं की सुरुवातीला या कंपनीने काही लोकांना पैसे दिले, पण जेव्हा कोट्यावधी रुपये जमा झाले त्यानंतर सगळं काही बदललं. जेव्हा लोकांनी पैसे परत मागितले तेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोबाइलच थेट बंद केला.
2023 मध्ये कंपनीचा स्कॅम हळू-हळू समोर आला
2023 मध्ये कंपनीचा स्कॅम हळू-हळू समोर आला. मोठे दावे आणि आमिश दाखवत कंपनीला जे काही करायचं होतं ते सगळ्यांपासून लपवून ठेवलं. जेव्हा लोकांनी त्या सोसायटीच्या लोकांवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली त्यानंतर सोसायटीच्या मालकानं सगळ्या एजंट आणि गुंतवणूक करणाऱ्यांशी संबंध तोडले.
जेव्हा लोकांनी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जाब विचारण्यास सुरुवात केली तेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांचे फोन बंद येऊ लागले. अखेर लोकांनी त्यांच्या ऑफिसला जाऊन भेट दिली. मात्र ऑफिसला टाळ होतं. ते दृश्य पाहून लोकांना त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. कंपनीचे कर्मचारी हे करोडोंची रक्कम घेऊन फरार झाले.
एफआयआरमध्ये श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्याव्यतिरिक्त 11 जणांची नावे
250 हून अधिक सुविधा केंद्रे होती जी एजंट्सद्वारे चालवली जात होती आणि वरिष्ठ अधिकारी फक्त ऑनलाइन पद्धतीने काम करत होते. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्याव्यतिरिक्त एकूण 11 जणांची नावे आहेत.
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये सोनीपत येथील विपुल कुमार यांनी सांगितले की, बहु-राज्य सहकारी संस्था कायद्यांतर्गत इंदूर, मध्य प्रदेश येथे ह्युमन वेल्फेअर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची नोंदणी करण्यात आली होती. जे 16 सप्टेंबर 2016 पासून हरियाणासह देशातील अनेक राज्यांमध्ये कार्यरत होते.
लोकांची करोडोंची फसवणूक
विपुलच्या म्हणण्यानुसार, राज्यभरात या कंपनीचे 250 सुविधा केंद्रे होते. या सोसायटीचे मुख्य कार्यालय हरियाणातील महेंद्रगडमध्ये होते. सोसायटीने पैसे जमा करण्यासाठी स्वत:चे सुविधा केंद्र सुरू केले होते. अशाप्रकारे, संपूर्ण हरियाणामध्ये 250 हून अधिक केंद्रे कार्यरत होती. तर काही शहरांमध्ये सोसायटीने स्वत:ची रुग्णवाहिका सेवा तसेच मोबाईल एटीएम व्हॅन सुरू केली होती. पण हा सगळा दिखावा होता.
लोकांची करोडोंची फसवणूक करणाऱ्या या कंपनीचे प्रमोशन केल्याबद्दल श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. पण सध्या तरी या अभिनेत्यांनी यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही.