हृदयद्रावक..! टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यूFile Photo
Published on
:
24 Jan 2025, 6:06 am
Updated on
:
24 Jan 2025, 6:06 am
पुणे: टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कृष्णा असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी टँकरचालक विजयकुमार फड (वय 32) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बबितादेवी (वय 22) यांनी हडपसर (काळेपडळ) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महातो दाम्पत्य सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरातील एका भंगार माल दुकानात कामाला आहे. दुकानाच्या पोटमाळ्यावर ते राहायला आहेत.
मंगळवारी (21 जानेवारी) दुपारी तीनच्या सुमारास कृष्णा भंगार माल दुकानासमोरील मोकळ्या जागेत खेळत होता. त्याची आई बबितादेवी यांनी त्याला चटईवर ठेवले होते. त्यावेळी तेथे आलेल्या पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली तो सापडलाआणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबत पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक शेटे तपास करत आहेत.