अतिक्रमण हटवले:सिल्लोड न्यायालय, तहसील परिसराने घेतला मोकळा श्वास
3 hours ago
2
सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावरील न्यायालय व तहसील कार्यालयाच्या इमारतीसमोर मोठ्या प्रमाणात हातगाडी व इतर व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले होते. याबाबत स्वतः न्यायाधीशांनी तहसील प्रशासनाला अतिक्रमण काढण्याबाबतचे पत्र मागील आठवड्यात दिले होते. या अनुषंगाने आता शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह न्यायालय व तहसील समोरील जवळपास १० ते १५ अतिक्रमणे काढली आहेत. शिवाय या अतिक्रमणधारकांना पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हे नोंदवण्यात येतील, अशी तंबी दिली. बसस्थानकालगत असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यावरील तहसील कार्यालय व न्यायालयासमोर मागील काही वर्षांपासून छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले होते. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे वादविवाद होत असत. याशिवाय या अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांनी अनेक अवैध धंदे सुरू केल्याच्या तक्रारी पोलिस प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. तरीही हे अतिक्रमण हटवण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नव्हते. अखेर मागील आठवड्यात न्यायाधीशांनी तहसीलदारांना अतिक्रमण हटवण्याबाबतचा पत्र दिले. पत्राची तत्काळ दाखल घेऊन तहसीलदार संजय भोसले यांनी नगर परिषद प्रशासन व पोलिस प्रशासनाशी याबाबत पत्रव्यवहार केला. त्यानुसार, गुरुवारी (२३ जानेवारी) शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दुपारी न्यायालय व तहसील समोरील जवळपास १० ते १५ अतिक्रमणे काढली. याशिवाय या अतिक्रमणधारकांना पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हे नोंदवण्यात येतील, अशी तंबी दिली. अतिक्रमण हटवल्यानंतर दोन्ही शासकीय कार्यालयांनी मोकळा श्वास घेतला आहे. याचप्रमाणे इतर ठिकाणी असलेल्या अतिक्रमणही पोलिस प्रशासनाने हटवावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. न्यायालय व तहसील कार्यालयासमोरील अतिक्रमण पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी गुरुवारी हटवले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)