मोंढा डीपीवरील लोड विभक्त करून दुरुस्तीसाठी निवेदन:अमोल शिरसाठ यांचे स. अभियंतांना निवेदन
3 hours ago
2
लासूरस्टेशन येथील वॉर्ड क्रमांक २ मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मोंढा डीपीवरील भार विभक्त करून डीपीची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी लासूर स्टेशन महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री. आहेर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर डीपीची दुरावस्था अत्यंत दयनीय झाली आहे. फ्यूज तुटलेले आहेत आणि डीपी समोरील झाकणही तुटलेले आहे. परिसरात लहान मुले खेळत असतात, यामुळे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. डीपीवर काम करता येत नाही. परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने स्ट्रीट लाईट लावायचे असले तरी पूर्ण शहराची लाईट बंद करावी लागते. तसे न झाल्यास आपल्या कार्यालयाला टाळे ठोकून वॉर्डातील नागरिकांसोबत जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अमोल शिरसाठ, उपविभाग प्रमुख माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण ठोळे, वॉर्ड शाखा प्रमुख साईराज चव्हाण आदींनी निवेदनात वरील मागणी केली आहे. यासाठी लवकरच निर्णय घेतला जावा, अशीही मागणी यादरम्यान करण्यात आली. यातून हा प्रश्न मार्गी लागू शकेल.याचा निश्चित फायदा ग्रामस्थांना होईल. डीपीवर लोड; गावातील नागरिक त्रस्त तसेच डीपीवरील लोड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे वारंवार फ्यूज उडण्याचा आणि लाईट जाण्याचा नाहक त्रास परिसरातील व्यापारी वर्ग व नागरिकांना सहन करावा लागतोय. आठ दिवसांत सदर डीपीची दुरुस्ती करावी व लोड विभक्त करून नवीन डीपीवर ट्रान्स्फर करावा, अशी विनंती दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)