उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
:
23 Jan 2025, 5:49 pm
Updated on
:
23 Jan 2025, 5:49 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका आमची शिवसेना जिकणारचं, असा निर्धार करत उद्धव ठाकरेंची अवस्था 'ना घर का ना घाट का' अशी झाली आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 'बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक' टोलाही त्यांनी यावेळी ठाकरेंना लगावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९९ वी जयंती आहे. यानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुंबईतील बीकेसीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.