तुळस : ठाकरे शिवसेनेतर्फे 48 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी.Pudhari Photo
Published on
:
23 Jan 2025, 5:05 pm
Updated on
:
23 Jan 2025, 5:05 pm
वेंगुर्ले : स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात एक चळवळ उभी करून महाराष्ट्राचे व मुंबई शहराचे नाव जगाच्या नकाशावर वेधून घेण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी आज (दि.२३) जानेवारी रोजी तुळस (ता.वेंगुर्ले) येथे बोलताना केले.
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी वृत्तपत्र, साप्ताहिक यांच्या माध्यमातून समाजास दिशादर्शक असे काम केले आहे. आज शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक असून भविष्यातील पिढी सुशिक्षित व्हावी, स्पर्धा परीक्षांमध्ये अग्रेसर रहावी तसेच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दिशा मिळावी हे ' व्हिजन ' डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यापुढेही संपूर्ण जिल्ह्यात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून शैक्षणिक तसेच अन्य क्षेत्रातही विविध सामाजिक उपक्रम निश्चितच राबविण्यात येतील, असेही ते म्हणाले.
वेंगुर्ले तालुका उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त आज वेंगुर्ले तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्या अनुषंगाने आज सकाळी श्री शिवाजी हायस्कुल तुळस मधील पाचवी व आठवी इयत्तेतील एकूण 48 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तके वाटप करण्यात आले. व्यासपीठावर ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश निकम, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, चंद्रकांत कासार , उभादांडा सरपंच निलेश चमणकर , तुळस विभागप्रमुख संदिप पेडणेकर ,रवींद्र राऊळ , समीर शेटकर ,विद्याधर माळकर ,युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट ,शैलेश परुळेकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. तुळसकर, शिक्षकवृंद विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रुपेश राऊळ यांनीही मार्गदर्शन केले. यानंतर वेंगुर्ले ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्व. ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी माजी शहरप्रमुख अजित राऊळ, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, माजी नगरसेवक तुषार सापळे, दिलीप राणे, श्रीकांत घाटे आदींसह अन्य पदाधिकारी , कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.मठ येथे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्व.ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी माजी उपसरपंच निलेश नाईक , महेश धुरी , प्रशांत नाईक , उमेश नाईक, महेश सावंत, श्री. गावडे, सुनील बोवलेकर, श्री. मठकर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. रेडी तसेच तालुक्याच्या अन्य भागातही पक्षातर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.