आतापर्यंतच्या इतिहासात असा विजय कधी मिळाला नव्हता. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्याला चौपट वेगाने काम करावं लागेल. त्यासाठी अहोरात्र काम करायला मी तयार आहे. हा भगवा डौलाने फडकवत ठेवेल हा शब्द देतो. बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा करणार नाही हे सांगतो. या शरीरातील रक्ताच्या प्रत्येक थेंबावर मायबाप जनतेचा हक्क आहे. तो हक्क कायम राहील. हे वचन देतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मी काम करत होतो. माझ्यासोबत तुम्ही रात्रीचा दिवस करून काम केलं. पायाला भिंगरी लावून आपण काम केलं हा मी माझा विजय समजतो. लँडस्लाईड मँडेड विजय आहे. आतापर्यंतच्या इतिहासात असा विजय कधी मिळाला नव्हता. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्याला चौपट वेगाने काम करावं लागेल. त्यासाठी अहोरात्र काम करायला मी तयार आहे. हा भगवा डौलाने फडकवत ठेवेल हा शब्द देतो. बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा करणार नाही हे सांगतो. या शरीरातील रक्ताच्या प्रत्येक थेंबावर मायबाप जनतेचा हक्क आहे. तो हक्क कायम राहील. हे वचन देतो. मी साधा कार्यकर्ता आहे. कालही होतो, आजही आहे. आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. खुर्चीसाठी एकनाथ शिंदे कधी कासावीस झाला नाही. होणार नाही. आई भवानीच्या आशीर्वादाने सर्व काही मिळालं. मुख्यमंत्रीपद मिळालं. जनतेची सेवा करता आली. जनतेच्या आयुष्यात बदल घडवता आला. त्यांचं जीवन सुखी करण्याची संधी मिळाली. राज्यातील बहिणींचा दोन कोटी ४० लाख बहिणींचा सख्खा भाऊ, लाडका भाऊ म्हणून ओळख मिळाली. ही पदापेक्षा मोठी आहे. खुर्चीची लालसा कुणाला आहे? आपल्याला कधीच नव्हती.
तुम्ही आमदार व्हाल, खासदार व्हाल, मंत्री व्हाल. सर्व पदे मिळतील. सर्वात आधी तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे कदापी विसरू नका. ज्या शिवसैनिकांनी आपल्याला मोठं केलं. महापौर, नगरसेवक, मंत्री, मुख्यमंत्री झाले. हा शिवसैनिक आपल्याला मोठं करतो. तो लोकात जातो. आपलं मार्केटिंग, ब्रँडिंग करतो. पण जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. शिवसैनिकाला अडचणीत मदत करा, तो आयुष्यभर तुमच्यासोबत राहील असं बाळासाहेब म्हणायचे. आपण शिवसेना वाढवण्याचं आणि घडवण्याचं काम केलं. आपल्याला कोणी गॉडफादर नाही, शिवसेनेचा विचार, बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे यांचे विचार हेच आपले गॉडफादर आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांची शिवसेना आपल्याकडे आली. धनुष्यबाण आपल्याकडे आलं. शिवसेना वाचवण्याचं काम तुम्ही केलं. म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ. पण जनतेने त्यांचा नक्शा उतरवून टाकला. शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे आहे, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.