राजन साळवींचा अखेर ठाकरेंना जय महाराष्ट्र?:उद्या रत्नागिरीत शिंदे गटात पक्ष प्रवेश करण्याची शक्यता, उदय सामंतांच्या दाव्यानंतर चर्चांना उधाण

4 hours ago 1
ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असून रत्नागिरीतून त्याची सुरुवात होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केला आहे. उद्या ठाकरे गटाच्या माजी आमदारांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही ते म्हणाले. उदय सामंत यांच्या दाव्यामुळे राजन साळवी एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. उद्योगमंत्री आज दावोस दौऱ्यावरून परतले आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला. ठाकरे गटाचे 4 आमदार 3 आणि 10 माजी आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरीतील काही माजी आमदार हे ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असून या प्रवेशाचा पहिला ट्रेलर उद्या रत्नागिरीत पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले. उदय सामंत यांच्या दाव्यानुसार, ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांचा शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजन साळवी हे ठाकरे गटाचे कोकणातील मोठे नेते आहेत. परंतु, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. साळवी लवकर शिंदे गटात प्रवेश करतील अशा चर्चाही रंगल्या आहेत. त्यातच उदय सामंत यांनी मोठा दावा केल्याने राजन साळवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळेल का? हे उद्या स्पष्ट होईल. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना राजन साळवी यांच्या मनात असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. या भेटीत साळवी यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्याबाबत उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली होती. यावेळी उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती होती. राजन साळवींच्या तक्रारीवर विनायक राऊतांना पक्षातून काढू की, जिल्हा प्रमुखाला काढू? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच तुम्हाला भाजपमध्ये जायचे असेल तर जा, अशा शब्दांत ठाकरेंनी राजन साळवींना सुनावले होती, असे सूत्रांनी सांगितले होते. हे ही वाचा... ठाकरेंचे 4 आमदार, 3 खासदार लवकरच शिंदे गटात:उद्या रत्नागिरीत पहिला ट्रेलर दिसेल, उदय सामंत यांचा मोठा दावा उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच बीड, नाशिक, परभणीमधील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि 10 माजी आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उद्या या पक्षप्रवेशाचा पहिला टप्पा असल्याचे देखील उदय सामंत यांनी सांगितले. तसेच माझी बदनामी करणाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश रोखून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article