सन २०२५ साठी जिल्हा वकील संघाची अध्यक्ष पदाकरीता निवडणुक
निवडणुकीत अॅड. सुनिलकुमार भुक्तार यांना २५६ तर अॅड. राजू जोशी यांनी ७२ मतदान
एकुण ३३० झाले मतदान
हिंगोली (Hingoli Bar Association) : जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष पदासाठी गुरूवारी पार पडलेल्या निवडणुकीत अॅड. सुनिल भुक्तार हे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. सन २०२५ च्या जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष पदासाठी २३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० ते ४ दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडली. या मतदाना करीता एकुण ३६९ मतदार पात्र होते. दिवसभरात ३३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
निवडणुक मतदानानंतर मतमोजणीची प्रक्रीया पार पडली. ज्यामध्ये अॅड. सुनिल कुमार राजकुमार भुक्तार यांना २५६ तर अॅड. राजू उध्दवराव जोशी यांना ७२ मतदान झाले. तर २ मतदान बाद ठरले. मत मोजणी अंती अॅड. सुनिलकुमार भुक्तार यांना विजयी घोषित करण्यात आले. (Hingoli Bar Association) निवडणुकीसाठी मुख्य निवडणुक निर्वाचण अधिकारी अॅड. बापुराव बांगर, सहाय्यक निवडणुक निर्वाचण अधिकारी अॅड. बी.एस. इंगळे, अॅड. एस. डी. चौतमल यांनी काम पाहीले. निवडणुकीत विजयी झालेले अॅड. सुनिलकुमार भुक्तार यांचा विधिज्ञांनी सत्कार केला.