कळमनुरी (Bar Association) : जन्म मृत्य नोंद प्रकरणे न्यायालय कनिष्ठ स्तर कडे पुन्हा वर्ग कडून नागरिकांना प्रमाणपत्र मिळणे संबंधी पुढाकार घेण्याची मागणी कळमनुरी वकील संघाकडून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय कायदा मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
अजाणतेपणामुळे व उदासीनता मुळे नागरिकांनी वेळीच जन्म व मृत्य ची नोंद न केल्यामुळे अनेक जण सदर प्रमाणपत्रसाठी (Bar Association) अर्ज करीत असताना प्रकरणे न्यायालय कनिष्ठ स्तर कडे चालविण्यात येत होती पण शासनाने सदर प्रकरणे सन २०२३ मध्ये तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वर्ग केली असता अनेक खोट्या नोंदी ची तक्रारी वरून राज्यशासन महसूल व वनविभागा कडून सदर प्रमाणपत्रे वितरित करू नये असे आदेश दि.२१ जानेवारी रोजी काढले.
यामुळे अनेक नागरिकांना प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक योजना व कायदेशीर बाबी साठी अडचण निर्माण झाली अनेक प्रकरणे प्रलंबीत आहे न्यायालय स्तरावर प्रमाणपत्र वाटप मध्ये पारदर्शकता राहणार यामुळे सदर प्रकरणे पुन्हा न्यायालय कनिष्ठ स्तरावर वर्ग करावे जेणे करून गरजू नागरिकांना न्याय मिळेल अशी मागणी कळमनुरी वकील संघाकडून केंद्रीय कायदा मंत्री यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.सदर निवेदन उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांना देण्यात आले. यावेळी अँड.मनोज देशमुख, गुणानंद पतंगे, व्ही.टी. माखणे, एल.एल.शिरसाठ, तातेराव देशमुख, एस.एस. तडस, अविनाश काळे, डी.पी.जाधव, प्रभाकर मोरे,विलास खंदारे,मदन मुठाळ, जि. एम.नांगरे,अरुण दांडेकर, आर.जे.जाधव, बि. व्ही.बलखंडे, इफ्तेखार नाईक,डी.एस.पाईकराव,वाय.एम.मुठाळ,पुजा कदम, सय्यद,वाघमारे,एस.टी.नरवाडे,एन.एस.घुगे आदींची उपस्थिती होती.