जवळा बाजारात युवकावर अंत्यसंस्कार
भोगाव पाटी जवळ झाला होता अपघात
जवळा बाजार (Tempo Accident) : बुधवारी दुपारी वसमत जवळ झालेल्या रस्ते अपघातात १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर जवळा बाजार येथे गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
बुधवारी दुपारी वसमत जवळील भोगाव पाटीवर आयशर टेम्पो ने धडक दिल्यामुळे जवळा बाजार येथील सोनबा कचरू आप्पा राऊत (१८) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. (Tempo Accident) गंभीर जखमी असल्याने त्याला आधी वसमत येथील रुग्णालयात दाखल केले होते व त्यानंतर नांदेड येथे हलवण्यात आले होते. नांदेड येथे हलवल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले होते. त्याच्यासोबत दुचाकी वर असलेला श्रीपाद भगवान जोशी गुंडेकर हा तरुणही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शवविच्छेदन झाल्यानंतर गुरुवारी सकाळी जवळाबाजार येथे मृतदेह आणल्यानंतर दुपारी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राऊत कुटुंबावर गत सहा महिन्यांमध्ये हा काळाचा तिसरा आघात (Tempo Accident) असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या साथीनंतर राऊत कुटुंबातील हा सहावा मृत्यू ठरला आहे.