जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते 'डॉक्टर ऑफ सायंन्स' या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले. Pudhari Photo
Published on
:
23 Jan 2025, 2:23 pm
Updated on
:
23 Jan 2025, 2:23 pm
परभणी : अन्न आणि उर्जा सुरक्षा महत्वाची आहे. हवामान बदलानुसार शेतीमध्ये विविध आव्हानांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळे या हवामान बदलाच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी आंतरविद्या शाखेचे ज्ञान अवगत करावे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी गुरूवारी येथे केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 26 व्या पदवीदान सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून राज्यपाल राधाकृष्णन यांनी मार्गदर्शन केले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सर्वश्री डॉ.राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर, कुलगूरू प्रा.डॉ.इंद्र मणी, खडकपुरच्या आयआयटीचे माजी संचालक प्रा.डॉ.विरेंद्रकुमार तिवारी यांच्यासह कार्यकारी परिषदेचे सदस्य आदींची यावेळी उपस्थिती होती.
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने सन्मानीत करण्यात आले. 2023-24 या शैक्षणिक वर्षातील विविध विद्या शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी.पूर्ण करणार्या 3462 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाने व दात्यांनी निश्चित केलेली सुवर्णपदके, रौप्य पदके व रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.