पुण्यातील खराडीमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला. पतीने कात्री घेऊन पत्नीच्या गळ्यावर वार केला. तिची हत्या केली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या पत्नीचा व्हिडीओ शूट करत पतीने या हत्येचे कारणही सांगितलं.
पुण्यात सध्या मोठी गुन्हेगारी वाढल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. इतकंच नाहीतर गुन्हेगारांचं फेव्हरेट डेस्टिनेशन म्हणून पुण्याला ओळख मिळाल्याचे चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू असताना पुण्यात एक क्रूरतेला लाजवणारी संतापजनक घटना घडली आहे. पतीने पत्नीची हत्या करून व्हिडीओ बनवला आहे. पुण्याच्या खराडी या भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून पतीने आपल्याच पत्नीची क्रूरपणे हत्या केली असून माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खराडी या भागात पतीने कात्री घेऊन पत्नीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर रक्तात पडलेल्या पत्नीचा व्हिडीओ शूट करत पतीने या हत्येचे कारणही सांगितलं. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून त्याने त्याच्या बायकोलाच ठार मारलं आहे. तर या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या पतीने साडे तीन मिनिटांचा एक व्हिडीओ शूट केला. हे सगळं केल्यानंतर तो आरोपी पतीने स्वत:च पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याने हत्येची कबुली दिली. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती शिवदास गिते मूळचा बीडमधील आहे. तो न्यायालयात टंकलेखक असून तुळजाभवानीनगर भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणांवरून वाद व्हायचे. ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात बुधवारी पहाटेही असेच वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले
Published on: Jan 23, 2025 02:48 PM