Saif Ali Khan: “सैफ एक कचरा, ‘हा’ कचरा साफ झाला पाहिजे”

4 hours ago 1

महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान…बघा VIDEO

मुंबई (Saif Ali Khan) : महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळणे आणि हल्ल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने याला अभिनय म्हटले आहे. सैफवरील हल्ल्याबद्दल प्रश्न उपस्थित करताना राणे म्हणाले की, “सैफ अली खानवर खरोखरच चाकूने वार करण्यात आला होता की, तो फक्त अभिनय होता काय?, सैफ (Saif Ali Khan) हॉस्पिटलमधून बाहेर पडताना नाचताना दिसला, असा दावा त्यांनी केला आहे.

मुंबईत बांगलादेशी घुसखोरीचे आरोप

मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईत बांगलादेशी घुसखोरीवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, “पूर्वी हे लोक चौकाचौकात उभे राहायचे, आता ते घरात घुसू लागले आहेत. (Saif Ali Khan) सैफच्या घरावर झालेला हल्ला हे त्याचे एक उदाहरण आहे. हा कचरा साफ झाला हे चांगले आहे.”

#WATCH | Pune: Maharashtra Minister Nitesh Rane says, "Look astatine what Bangladeshis are doing successful Mumbai. They entered Saif Ali Khan's house. Earlier they utilized to basal astatine the crossings of the roads, present they person started entering houses. Maybe helium came to instrumentality him (Saif) away. It is… pic.twitter.com/XUBwpwQ6RQ

— ANI (@ANI) January 23, 2025

सैफला कचराची उपमा?

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एका रॅलीत म्हटले आहे की, “मुंबईत बांगलादेशी काय करत आहेत. ते सैफ अली खानच्या घरात घुसले. पूर्वी ते रस्त्याच्या चौकात उभे राहायचे, आता ते घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित ते त्याला (सैफला) घ्यायला आलो असणार. बरं आहे, कचरा काढायला हवा.” ते पुढे म्हणाले की, “मी पाहिले की, जेव्हा तो हॉस्पिटलमधून बाहेर आला, तेव्हा मला शंका आली की, त्याला चाकूने वार करण्यात आले आहे की तो अभिनय करत आहे. तो चालताना नाचत होता. जेव्हा जेव्हा (Shah Rukh Khan) शाहरुख खान किंवा सैफ अली खान (Saif Ali Khan) सारखा यांच्यावर हल्ला होतो, तेव्हा सर्वजण त्याबाबत बोलतांना दिसतात. मात्र सुशांत सिंग राजपूत सारख्या हिंदू अभिनेत्याला त्रास दिला जातो, तेव्हा कोणीही काहीही बोलण्यासाठी पुढे येत नाही.”

हिंदू कलाकारांविरुद्ध भेदभावाचे आरोप

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) सारख्या अभिनेत्यांबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर राणे (Nitesh Rane) यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “या मुद्द्यांवर जेव्हा जेव्हा कोणतीही घटना घडते तेव्हा सगळेच बोलतात. पण जेव्हा सुशांत सिंग राजपूत सारख्या हिंदू कलाकाराला त्रास दिला जातो तेव्हा कोणीही पुढे येत नाही.”

राणेंनी नेत्यांवर साधला निशाणा

राणे यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांसारख्या नेत्यांनाही लक्ष्य केले. त्यांनी आरोप केला की, या नेत्यांना फक्त सैफ अली खान (Saif Ali Khan), शाहरुख खान आणि नवाब मलिक सारख्या लोकांची काळजी आहे. त्यांनी प्रश्न केला, “कोणत्याही हिंदू कलाकाराची काळजी घेतली गेली आहे का?”

राणे यांचे जनतेला आवाहन

मंत्र्यांनी जनतेला या मुद्द्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आणि असे म्हटले की, अशा बाबी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. 16 जानेवारीच्या रात्री एका व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात (Saif Ali Khan) सैफ गंभीर जखमी झाला. त्यांची न्यूरो सर्जरी 6 तास चालली. सैफ आता ठीक आहे आणि घरी परतला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article