महिलेच्या मुलाने मृतदेह रेल्वेतून नेण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. Pudhari Photo
Published on
:
23 Jan 2025, 1:59 pm
Updated on
:
23 Jan 2025, 1:59 pm
जळगाव; पुढारी वृत्तसेवा: जळगावमधील परधाडेजवळ पुष्पक एक्स्प्रेस मधील प्रवासी दुसऱ्या रेल्वे गाडीखाली सापडल्याने मृत्युमुखी पडले होते. या अपघातात नेपाळमधील एका महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्या महिलेच्या मुलाने मृतदेह रेल्वेतून नेण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्या मुळे प्रशासनासमोर उभा राहिलेला मोठा पेच सुटला आणि रूग्णवाहिका आज (दि.२३) सायंकाळी रवाना झाली.
पुष्पक एक्सप्रेसने बुधवारी (दि. 22) मुंबईकडे प्रवास करणाऱ्या कमला नवीन भंडारी (वय 42, रा. नेपाळ) या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा तपेंद्र भंडारी आईचा मृतदेह घेण्यासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज आला होता.
रेल्वे प्रशासनाने नेपाळ पर्यंत रेल्वेने कमला भंडारी यांचा मृतदेह नेण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, मुलगा तेपेंद्र भंडारी येणे रेल्वेने आईचा मृतदेह नेपाळला नेण्यास नकार दिला. ज्या रेल्वेने माझ्या आईचा मृत्यू झाला. त्या रेल्वेतून मला मृतदेह न्यायचा नाही. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. तर प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. पत्रकार, पोलीस, महसूल आणि रेल्वे प्रशासन यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेपाळपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला .