आखाडा बाळापूर (Akhara Balapur execution Case) : येथील शासकीय कंत्राटदार प्रकाश कोळेकर यांचा मुलगा साईनाथ प्रकाश कोळेकर (१७) याचा नांदेड येथे आनंद नगर भागातील राज मॉल परीसरात खुन झाला. गुरुवारी दुपारी नांदेड येथे मृतदेह शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आखाडा बाळापूर (Akhara Balapur execution Case) येथील नागरिक, युवक मोठ्या प्रमाणात यावेळी रात्रीपासून रूग्णालयात उपस्थित होते. सदर विद्यार्थ्यांच्या खुनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
आखाडा बाळापूर (Akhara Balapur execution Case) येथील प्रकाश कोळेकर हे दोन मुलांच्या शिक्षणासाठी नांदेड येथे राहून ये – जा करतात. त्यांचा मोठा मुलगा साईनाथ प्रकाश कोळेकर अकराव्या वर्गात असुन नांदेड येथे त्याचे क्लास लावण्यात आले होते. बुधवार रोजी सायंकाळी साईनाथ याच्यावर चाकुने खुनी हल्ला झाला. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होउन त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार सह पोलीस अधिकारी कर्मचारी पथक भेट दिली. सदर प्रकार बाळापूर येथे समजल्यावर रात्री अनेक जण नांदेडला गेले होते. शवविच्छेदन दुपारी झाले आखाडा बाळापूर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आरोपीवर कठोर कार्यवाही करावा
आखाडा बाळापूर (Akhara Balapur execution Case) येथील अल्पवयीन विद्यार्थी साईनाथ प्रकाश कोळेकर याच्यावर चाकुने वार करून खुन करण्यात आला या घटनेचा आखाडा बाळापूर भागात तीव्र संताप व्यक्त होत आसुन पोलिसांनी आरोपी पकडून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.