मुख्याधिकारी अरविंद मुंढेंनी घेतली बैठक
हिंगोली शहरात ३३ ठिकाणी दिली जाणार परवानगी
हिंगोली शहरात ३३ ठिकाणी दिली जाणार परवानगी
हिंगोली (Hingoli banners) : शहरामध्ये नगर पालिकेने निश्चित केलेल्या ३३ ठिकाणी पोस्टर, बॅनर, होल्डिंग व फ्लेक्स लावण्या संदर्भात मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या उपस्थितीत २३ जानेवारीला बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक सुचना देण्यात आल्या.
हिंगोली शहरात लावण्यात येणारे (Hingoli banners) बॅनर, होल्डिंग, फ्लेक्स, पोस्टर या संदर्भात उच्च न्यायालयाच्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्याकरीता हिंगोली नगर पालिका हद्दिच्या क्षेत्रात एकुण ३३ ठिकाणी जागा निश्चित केल्या आहेत. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या उपस्थितीत २३ जानेवारीला बैठक घेण्यात आले. नगर पालिकेने ठरवून दिलेल्या जागे व्यतिरिक्त बॅनर, होल्डिंग, फ्लेक्स, पोस्टर लावल्यास संबंधितावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच नगर पालिकेने नियुक्त केलेल्या ३३ ठिकाणी बॅनर, होल्डिंग, फ्लेक्स, पोस्टर लावण्या संदर्भात नगर पालिकेकडून त्याची रितसर परवानगी घेतल्यानंतर बॅनर, होल्डिंग, फ्लेक्स, पोस्टर यावर क्युआर कोड व बॅनरची मुद्दत नमुद करणे आवश्यक आहे.
तसेच (Hingoli banners) बॅनर, होल्डिंग, फ्लेक्स, पोस्टरवर प्रिंटींग प्रेसचे नाव, मोबाईल नंबर आणि क्युआर कोड टाकणार नाहीत त्याच्या विरूध्द नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला. बॅनर, होल्डिंग, फ्लेक्स, पोस्टर लावण्या संदर्भात कमीत कमी एक दिवस अगोदर नगर पालिकेची परवानगी घेण्याकरीता अर्ज करणे आवश्यक आहे. मुदत संपल्यानंतर संबंधितांनी स्वत:हून बॅनर, होल्डिंग, फ्लेक्स, पोस्टर काढणे आवश्यक आहे. तसेच नगर पालिकेने नियुक्त केलेल्या ३३ ठिकाणी बॅनर, होल्डिंग, फ्लेक्स, पोस्टर रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे बंधनकारक आहे.
तसेच त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडल्यास संबंधित व्यक्ती जबाबदार राहणार आहे. हिंगोली नगर परिषदेतर्फे अनेक ठिकाणी सुशोभिकरणाच्या हेतूने पुतळे उभारले आहेत. तसेच शहरात अनेक महापुरूषांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत. या भोवताली कोणीही (Hingoli banners) बॅनर, होल्डिंग, फ्लेक्स, पोस्टर लावू नये तसेच महाराष्ट्र विरूपन अधिनियम १९६५ चे कलम २ (क) नुसार कोणतीही पूर्व सुचना न देता बॅनर काढून फौजदारी दंड संहिता अंतर्गत कारवाई केली जाईल अशा सुचना देण्यात आल्या. या बैठकीस अनेकांची उपस्थिती होती.
..अन्यथा संबंधितावर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाणार
हिंगोली शहरात नगर पालिकेने ३३ ठिकाणी जागा निश्चीत केली आहे. या जागे व्यतिरिक्त तसेच कोणीही विना परवाना (Hingoli banners) बॅनर, होल्डिंग, फ्लेक्स, पोस्टर लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल असा इशारा मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी दिला आहे.