परभणी (Convocation ceremony) : विद्यार्थ्यांनी आपल्या कुटूंबाला प्राधान्य द्यावे, पालकांना समाधानी ठेवून त्यांचा आदर करावा आणि स्वत:ही आनंदी राहावे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. गुरुवार २३ जानेवारी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजीत २६ व्या दीक्षांत समारंभात (Convocation ceremony) अध्यक्षपदावरुन राज्यपाल बोलत होते.
व्यासपीठावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ.डॉ. राहूल पाटील, आ.डॉ. रत्नाकर गुट्टे, आ. राजेश विटेकर, कुलगुरु इंद्र मणि, प्रा.डॉ. विरेंद्रकुमार तिवारी, प्रविण देशमुख, डॉ. दिलीप देशमुख, भागवत देवसरकर, आदिती सारडा, विठ्ठल सपकाळ, डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव संतोष वेणीकर, डॉ. खिजर बेग, डॉ. गिरधारी वाघमारे, प्रविण निर्मळ, दिपक कशाळकर, डॉ. प्रताप काळे, डॉ. गजानन भालेराव, डॉ. शरद गडाख, डॉ. नितीन पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, डॉ. पी.जी. इंगोले, डॉ. ए.एल. फरांदे, डॉ. व्हि.के. पाटील, डॉ. के.पी. गोरे, डॉ. ए.एस. धवन, डॉ. व्हि.डी. पाटील, डॉ. डी.एन. गोखले, डॉ. यु.एन. खोडके यांची उपस्थिती होती. कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी विद्यापीठाच्या प्रगती अहवालाचे वाचन केले. सुत्रसंचलन डॉ. विना भालेराव, डॉ. डि.जी. मोरे यांनी केले.
३ हजार ४६२ स्नातकांना पदवी
दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून (Convocation ceremony) सन्मानीत करण्यात आले. तसेच वनाकृवितील ३ हजार ४६२ स्नातकांना विविध पदवी देण्यात आल्या. यात आचार्य पदवीचे २९, पदव्युत्तर पदवीचे ३०७ व पदवी अभ्यासक्रमाचे ३ हजार १२६ स्नातकांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदक, रौप्य पदक व रोख पारितोषीकाचेही वितरण करण्यात आले.
शेतकर्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल
शेतकर्यांच्या उत्पादनास चांगला भाव मिळावा म्हणून शासन विविध उपक्रम राबवत आहे. शेतकर्यांच्या उत्पादन वाढीसाठी विद्यापीठ स्तरावर विविध प्रयोग केले जात आहेत. हवामान बदलानुसार तंत्रज्ञान विकसीत करुन शेतकर्यांना तंत्रज्ञान देण्याची जबाबदारी (Convocation ceremony) विद्यापीठावर आहे. पारंपारीक शेतीमधून बदल करुन विद्यापीठ कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा मानसत आहे.
– ना. माणिकराव कोकाटे, कृषीमंत्री,