सीसीटीव्ही कॅमेर्यात बुरखा घातलेल्या दोन महिला कैद; गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli Crime) : शहरातील सराफा बाजारात एका ज्वेलर्स दुकानात ग्राहक म्हणुन आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी दागिणे घेण्याचा बहाणा करून भरदिवसा अडीच लाख रुपयाचा सोन्याचा हार लंपास केल्याने २२ जानेवारीला (Hingoli Crime) हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील सराफा बाजारात शेख फय्याज हाजी ईस्माईल यांचे आयशा ज्वेलर्स दुकान आहे. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.२० च्या सुमारास दुकानात बुरखा घातलेल्या दोन महिलांनी प्रवेश केल्यानंतर सोन्याचे दागिणे घेण्याचा बहाणा करून वेगवेगळ्या पध्दतीचे दागिणे दाखविण्यास सांगितले.
दुकानातील व्यवस्थापकाने त्यांना काही दागिणे दाखविले असता वारंवार दुसर्या दागिण्याकडे बोटाने दर्शवून त्यास गुंतवुन ठेवण्यात आले. याच वेळी महिलांना दाखविण्यात आलेल्या दागिण्यापैकी दुकानाच्या काऊंटरवर ठेवलेला ३ तोळे ५ ग्रॅमचा २ लाख ५० हजार २५० रुपयाचा सोन्याचा चौकर हार या महिलांना चक्क बुरख्यामध्ये दडविला. यानंतर सदर महिलांनी दागिणे पसंत नसल्याचा बहाणा करून दुकानातून पाय काढता घेतला.
काही वेळानंतर दुकानातील व्यवस्थापकास सोन्याचा चौकर हार दिसून आला नसल्याने त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरूवात केली असता बुरखा घातलेल्या दोन महिलांनी हा सोन्याचा चौकर हार लंपास केल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी महिलांचा शोध घेण्यात आला. काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही काढण्यात आले. सदर चोरी बाबत २२ जानेवारीला शेख फय्याज हाजी ईस्माईल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी बुरखाधारी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या (Hingoli Crime) प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव हे करीत आहेत.