Ajit Pawar Sharad Pawar Meeting : आज एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले. पण दादांनी काकांच्या शेजारी बसणं टाळलं. तर त्याआधी बंद दाराआड त्यांच्यात चर्चा झाल्याने दोन्ही गोटातील कार्यकर्त्यांच्या आशांना पंख फुटले.
एकच मंचावर काका-पुतण्या
शरद पवार आणि अजित दादा हा पवार कुटुंबियांसाठीच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी पण हळवा कोपरा आहे. काका-पुतण्यात दिलजमाई होण्याच्या चर्चांना अचानक अधूनमधून उकळी येते. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही नेते एकाच मंचावर दिसून आले. पण यावेळी दादांनी, काकांच्या शेजारी बसणं टाळलं. नावाची पाटीची जागाच बदलली. अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले होते.
बातमी अपडेट होत आहे…