हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष मानले गेले आहे. मौनी अमावस्येला स्नान आणि दान करण्याची परंपरा शतकानूशतके चालत आलेली आहे. हिंदू धर्म ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की जे लोक मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा सह इतर पवित्र नदीमध्ये स्नान करतील आणि दान करतील त्यांना पुण्य प्राप्त होईल म्हणून अमावस्येला उपवास आणि देवांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी महादेवांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते.
मौनी अमावस्या पितरांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. गरुड पुराणात म्हटले आहे की मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान करावे. मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान केल्याने तीन पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतो. पितरांना मोक्ष प्राप्त झाल्यानंतर ते त्यांच्या वंशजाना आशीर्वाद देतात. पूर्वजांच्या आशीर्वादाने सुख सौभाग्य आणि वंशवृद्धी होते. त्यामुळे या दिवशी पितरांचे पिंडदान करताना कोणत्या मंत्रांचा जप करावा हे जाणून घेऊ. तसेच पिंडदान करण्याची पद्धत काय आहे ते जाणून घेऊ.
कधी आहे मौनी अमावस्या?
मौनी अमावस्या 28 जानेवारीला संध्याकाळी 6:35 ला सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:05 मिनिटांनी संपेल. त्यामुळे अमावस्या 29 जानेवारीला असेल. 29 जानेवारीला मौनी अमावस्या चे व्रतही केले जाणार आहे. त्याच दिवशी महा कुंभात दुसरे अमृत स्नानही होणार आहे.
हे सुद्धा वाचा
पिंड दान करण्याची विधी
- पिंडदान करण्यापूर्वी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
- नंतर आपल्या पूर्वजांचा फोटो स्वच्छ ठिकाणी ठेवा आणि तिथे पाणी ठेवा.
- यानंतर शेण, मैदा, तीळ आणि जव यांचे गोळे तयार करा आणि ते पितरांना अर्पण करा.
- गाईच्या शेणापासून पिंड तयार करून पितरांच्या नावाने श्रद्धा करून ते नदीत मध्ये सोडून द्या.
- पिंडदानाच्या वेळी मंत्रांचा जप करा. जेणेकरून पितृदोषापासून मुक्ती मिळेल.
- या दिवशी ब्राह्मणांना दान अवश्य करा.
पिंडदान करताना या मंत्रांचा करा जप
ऊं पयः पृथ्वियां पय ओषधीय, पयो दिव्यन्तरिक्षे पयोधाः.
पयस्वतीः प्रदिशः सन्तु मह्यम.
कुर्वीत समये श्राद्धं कुले कश्चिन्न सीदति.
पशून् सौख्यं धनं धान्यं प्राप्नुयात् पितृपूजनात्.
देवकार्यादपि सदा पितृकार्यं विशिष्यते.
देवताभ्यः पितृणां हिपूर्वमाप्यायनं शुभम्.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)