हरित हायड्रोजन उत्पादनाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी मोठी कामगिरी:भारती विद्यापीठाच्या विज्ञानम संघाला स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये संयुक्त विजेतेपद

3 hours ago 1
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे च्या 'विज्ञानम' या विद्यार्थी गटाने प्रतिष्ठित स्मार्ट इंडिया हॅकथॉन (एसआयएच) २०२४ च्या संयुक्त विजेतेपद मिळवले आहे. या हार्डवेअर प्रकारातील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केले होते. विज्ञानम विद्यार्थी गटाने औद्योगिक स्तरावर हरित हायड्रोजन उत्पादनासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित केली. यामुळे भारताच्या शाश्वत विकास आणि शून्य-कार्बन उत्सर्जन उद्दिष्टांना हातभार लागेल. या टीममध्ये शिवम झा, सविता श्रीवास्तव, वरुण कुशवाहा, मीन नेपाळी, शाइस्ता अफरीन आणि ध्वनित शाह यांचा समावेश होता. या टीमला डॉ. प्रद्युम्न वायफळकर यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, उपप्राचार्य डॉ.सचिन चव्हाण, उपप्राचार्य डॉ.सुनिता जाधव आणि आयआयसी संयोजक डॉ.सुनिता धोत्रे यांचे मार्गदर्शन मिळाले. या विद्यार्थी गटाचे नेतृत्व करणारे शिवम झा यांनी प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, आमचे मॉडेल विस्तारल्यानंतर दररोज ५० टनांहून अधिक हरित हायड्रोजन निर्धारित आवश्यकतेपेक्षा ($२ यु एस डी/किग्रा )कमी किंमतीत तयार करण्याची क्षमता आहे. हे मॉडेल शून्य-किंमतीच्या ऊर्जा पुरवठा प्रणालीवर आधारित असून, शून्य-किंमतीचे इनपुट स्त्रोत आणि समुद्राच्या पाण्याचा वापर हायड्रोजन निर्मितीसाठी केला जातो. हा प्रकल्प भारत सरकारच्या शून्य-कार्बन उत्सर्जन धोरणाला पूरक असून स्वच्छ व शाश्वत ऊर्जा भविष्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट सफल करतो. प्राचार्य डॉ.राजेश प्रसाद म्हणाले, ही कामगिरी आमच्या विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या कठोर परिश्रम आणि नवकल्पनाशीलतेचे प्रतीक आहे. हा प्रकल्प वास्तविक ऊर्जा समस्यांचे निराकरण करत असून, भारताच्या नवीकरणीय ऊर्जा आकांक्षांना हातभार लावत आहे. टीम विज्ञानमने नावीन्य आणि उत्कृष्टतेसाठी एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article