यंग शेफ ऑलिंपियाडचे 2 ते 8 फेब्रुवारी आयोजन:50 देशांतील तरुण शेफ 5 शहरांत दाखवणार कौशल्य, स्पर्धेमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर

3 hours ago 1
विद्यार्थी शेफसाठी जगातील सर्वांत मोठी पाककृती स्पर्धा असलेल्या यंग शेफ ऑलिंपियाडची (वायसीओ) ११ व्या स्पर्धेचे आयोजन या वर्षी दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी या आठवडाभराच्या कालावधीत पुण्यासह देशातील पाच शहरांमध्ये करण्यात आले आहे. खाद्यपदार्थांच्या माध्यमातून एकता आणि शाश्वततेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या वायसीओ २०२५ मध्ये 'यंग कलिनरी ऑलिंपियन्स' तसेच मार्गदर्शकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या (आयआयएचएम) नेतृत्वाखाली इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काउन्सिल (आयएचसी) लंडनच्या भागीदारीत ही स्पर्धा आयोजित केली जाते. प्रतिष्ठित वायसीओ २०२५ चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यासाठी व पाककला आणि आदरातिथ्य उद्योगातील जागतिक तज्ज्ञांकडून कौशल्यांचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्पर्धकांना पाककृती आव्हानांच्या दोन फेऱ्या पार पाडाव्या लागतील. या वर्षीची वायसीओ स्पर्धा आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा (एआय) आदरातिथ्य क्षेत्र आणि यातील अभ्यासक्रमात वापर करून करण्याच्या एका नव्या विश्वात झेप घेण्यासाठी सज्ज आहे. यानिमित्त पुण्यात माध्यमांशी बोलताना, इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काउन्सिलचे (आयएचसी) सीईओ डॉ. सुबोर्नो बोस म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) आणि आदरातिथ्य उद्योग यांचा मेळ हे केवळ भविष्यच नाही तर वर्तमान आहे. हे पुस्तक केवळ एक मार्गदर्शक नाही; ते वर्तमान काळातील वास्तव आणि भविष्यासाठी एक दृष्टी आहे. पाहुण्यांशी वैयक्तिकृत संवादांपासून ते कामकाजापर्यंत, एआय हॉस्पिटॅलिटी व्यवसायाच्या प्रत्येक पैलूमध्ये क्रांती घडवत आहे. हे तंत्रज्ञान या क्षेत्राला अधिक बुद्धिमान आणि अधिक मानवीय बनवू शकते. या स्पर्धेच्या फेऱ्या तीन फेब्रुवारीपासून गोव्यात आणि चार फेब्रुवारीपासून दिल्ली, पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे आयआयएचएमच्या कॅम्पस किचनमध्ये सुरू होतील. दोन्ही फेऱ्यांमधील गुणांनुसार टॉप १० 'ऑलिंपियन' आठ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे होणाऱ्या वायसीओ २०२५ च्या ग्रँड फिनालेमध्ये भाग घेतील. प्लेट ट्रॉफी स्पर्धादेखील एक दिवस आधी सात फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाईल, ज्यामध्ये पहिल्या फेरीत ११ ते २० स्थानांवर असलेले स्पर्धक स्पर्धा करतील, तर डॉ. सुबोर्नो बोस चॅलेंज सहा फेब्रुवारी रोजी आयोजित केले जाईल.पुण्यात चार फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या फेरीत अझरबैजान, स्कॉटलंड, इजिप्त, मॉरिशस, सौदी अरेबिया, तुर्की, नेदरलँड्स, लेसोथो, इटली आणि बांगलादेश येथील विद्यार्थी सहभागी होतील.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article