जळगाव रेल्वे अपघाताता 13 प्रवाशांचा मृत्यू:बसपा नेते डॉ. चलवादींची दोषींवर कारवाई आणि मृतांच्या कुटुंबियांना मदतीची मागणी

3 hours ago 1
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात १३ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. डॉ. चलवादी यांनी गुरुवारी या घटनेबाबत महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांना चिरडणाऱ्या व्यवस्थेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी. घटनेच्या तपशिलानुसार, पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी चेन पुलिंग केले. मात्र या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या समन्वय यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कर्नाटक एक्सप्रेसचा हॉर्न वाजला नाही आणि स्टेशनवरून योग्य समन्वय न झाल्याने ही दुर्घटना घडली. डॉ. चलवादी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, संबंधित लोको पायलट आणि स्टेशनवरील अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. या घटनेची सखोल चौकशी करून आग लागल्याची अफवा कोणी पसरवली, प्रशासनाकडून योग्य समन्वय का झाला नाही, याची तपासणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article