Published on
:
27 Nov 2024, 8:05 am
Updated on
:
27 Nov 2024, 8:05 am
छत्रपती संभाजीनगर : अमेरिका, ब्रिटन आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये उत्पादित ओजी कुश (हायब्रीड) गांजा शहरातील निद्यार्थ्यांना विक्री करणाऱ्या हायप्रोफाईल घरातील तरुणाला अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखेच्या (नाकोटिक्स) आरोपी पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई सोमवारी (दि. २५) दुपारी बीड बायपास मागातील एमआयटी कॉलेजजवळ एका अभ्यासिकेत करण्यात आली. प्रशिल हिमां ब्रह्मा (२९, रा. ४० ग्रीन्स, कांचनवाडी, सातारा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. तो अभ्यासिका अणि निमेशन इन्स्टिटयूट चालविताना गांजा विक्री करत असल्याचे समोर आले आहे. कॉलेजचे विद्यार्थी त्याच्या संपर्कात होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुन्हे शाखेअंतर्गत नाकॉटिस सेलला एमआयटी कॉलेजजवळ अभ्यासिकेत प्रशिल हा विद्यार्थ्यांना विदेशी गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. सेलच्या पोलिस निरीक्षक गीता बागवदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाने अभ्यासिकेत छापा मारून झडती घेतली. तिथे प्रशिलकडे पिशवीत २११ ग्रॅम विदेशी गांजा (ओजी-कुश) आढळून आला. हा गांजा नाशिक येथील एजंट डॉ. ग्रीन याच्याकडून आणून विक्री केल्याची त्याने कबुली दिली. त्याच्याकडून ४ लाख २८ हजारांचा विदेशी गांजा जप्त केला. त्याला आतारा पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिम निरीक्षक गीता बागबडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, प्रशिल अंमलदार महेश उगले यांच्या पथकाने केली. दरम्यान, हायप्रोफाईल घरातील प्रशिल ब्रह्या याच्यावर कारवाई झाल्याची माहिती मिळताच सदर ते मुंबई अनेकांनी फोनाफोनी केल्याचे कळते, मात्र पोलिसांनी कारवाई करून शेवटी त्याला अटक केली.
ब्रह्मा याला गांजाचा पुरवठा करणाऱ्याची साखळी शोधण्याचे काम सातारा पोलिस किती गतीने करतील हे पाहणे महत्वाचे आहे.
वैद्यकीय वापरासाठी असे स्टिकर
ब्रह्या याच्याकडून पोलिसांनी ओजी-कुश मावाचा गांजाच्या पुड्या जप्त केल्या. त्यातील चिले व आगि पर्पल स्कुन्क हायब्रीड टीएचजी १८० २२६, सीवीडी २% जी : १.०० नाचाच्या पुडीवर प्रोडक्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि वैद्यकीय वागरासाठी आहे, असे स्टिकर लावलेले होते.
वेगवेगळ्या प्रकारचा ओजी-कुश
ब्रह्या याच्याकडे सापडलेल्या ओजी-कुश गांजा महाग असल्याने हायप्रोफाईल लोकच ओढतात. हा गांजा ओढल्यानंतर माणूस ७ ते ८ तास सलग काम करू शकतो. चेह-यावरील हावभान बदलत नाहीत. त्यामुळे माणूस नशेत असल्याचे कळत नाही. डोक्यावर, शरीरावर परिणाम करणारे आणि काही आराम, उत्साहवर्धक अशा प्रकारचे हायब्रीड गांजाचा प्रकार तो विक्री करत होता.
लंडनला शिक्षण घेऊन कोरोनाकाळात परतला
प्रशिल ब्रह्या याचे वडील एका नामांकित कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहेत, तर आई डीउर पदावर एका संस्थेत आहे. प्रशित हा लंडन येथे शिक्षणासाठी गेला होता. तिथे त्याचा एक सुपही आहे. जोजी-कुश गांजा त्याने तिथेच ओढला होता. तिथे कॉफी शॉपमध्ये सहज मिळायचा. प्रशिल बीए हॉटेल मोटेल प्रशासन, व्यवस्थापनची पदवी घेऊन लॉकडाऊनच्या काळात देशात परताला. त्याने एमआयटी कलिक्च्या बाजूलाच अॅनिमेशन प्रग्निटट्यूट आणि अभ्यासिका सुरू केली होती.
कॉलेजच्या बाजूलाच ५ ते ६ हजार ग्रॅमने विक्री
ब्रह्मा २ ते ३ हजार रुपये प्रतिमिने नाशिकचा पेडलर डॉ. ग्रीन याच्याकडून ओजी कुश घेऊन यायचा. कॉलेजच्या परिसरात तो हायप्रोफाईल विद्यार्थी आणि शहरातील काही लोकांना ५ ते ६ हजार रुपये प्रतिमि या भावाने विक्री करत होता. कॉलेजच्या बाजूलाच त्याने अभ्यासिका सुरू केली होती. त्यामुळे अनेक हायप्रोफाईल घरातील विद्यार्थी त्याच्या संपर्कात होते.
मनपाच्या पम्पिंग स्टेशनमध्ये गांजाची झाडे
प्रशिल ब्रह्मा याची पोलिसांनी चौकशी केली. त्याने विदेशीसोबत देशी गांजाचीही विक्री करत असल्याचे सांगितले. गोलवाडी येथील मनपाच्या पम्पिंग स्टेशन आवारात प्रकाश सलामपुरेने गांजाची झाडे लावून तेथून देशी गांजाचा पुरवठा केल्याची माहिती दिली. पोलिसांनी पम्पिंग स्टेशन गाठले. कंपाऊंडच्या आत गेल्यानंतर पेरूच्या झाडांमागे दोन गांजाची झाडे आढळून आली. १ लाख २० हजार ५४० रुपयांच्या गांजाची झाडे तोडून जाप्त केली. सलामपुरे याचाही आरोपीमध्ये समावेश करण्यात आला आहे.