अमोल मिटकरींना पार्थ पवारांनी झापले:माध्यमांना बाईट न देण्याचा दिला इशारा, मिटकरींच्या लेखावरून पेटला वाद
2 hours ago
1
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कॅम्पेन करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अजित पवारांची भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यावेळी नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवल्याने वाद निर्माण झाला आहे. अमोल मिटकरी यांनी अरोरा यांना यावरून सुनावले आहे. या वादात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी देखील उडी घेतली आहे. नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवल्यावरून अमोल मिटकरी यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. शेवटी तुम्ही पगारावरील शिपाई आहात, असा टोला मिटकरी यांनी लगावला होता. यावर पार्थ पवार यांनी अमोल मिटकरी यांना चांगलेच झापले आहे. तसेच मीडियाल बाईट सुद्धा द्यायचा नाही, असा इशारा देखील देण्यात आला आहे. पार्थ पवार यांनी एक्सवर लिहिले की, अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे आमदार असूनही पक्षाच्या भूमिकेविरुद्ध भूमिका घेत आहेत, हे दुर्दैवी आहे. नरेश अरोरा आणि डिझाईन बॉक्स संदर्भातील त्यांच्या वक्तव्याचा माझा पक्ष आणि माझे वडिल अजिबात समर्थन करत नाहीत. तसेच, मिटकरी यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये, असा इशारा पार्थ पवार यांनी दिला आहे. हे ट्विट त्यांनी इंग्रजी भाषेत लिहिले आहे. अमोल मिटकरी यांनी एका वृत्तपत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यशावर लेख लिहिला आहे. यात त्यांनी काही वादग्रस्त विधाने केली आहेत. तसेच अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांच्यावर टीका करत थेट तुम्ही पगारी शिपाई असल्याचे त्यात म्हंटले आहे. तसेच वर्तमानपत्रातील लेखात यशाचे डिझाईन राष्ट्रवादीचेच असा टोला त्यांनी लगावला आहे. अजित पवारांच्या मिडिया कॅम्पेनिंगमध्ये नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीनेही पीआर एजन्सी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. अजित पवारांचे गुलाबी कॅम्पेन त्यांच्याच माध्यमातून करण्यात आले होते. त्यामुळे, आता विजयानंतर श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. मात्र, या सगळ्यावर पार्थ पवारांनीच प्रतिक्रिया दिली असल्याने हा वाद मिटण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला होता. तसेच त्यांचे कॅम्पेन देखील महाराष्ट्रात चांगलेच चालले असल्याचे दिसून आले आहे. या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा अजित पवारांच्या पक्षाला चांगलाच फायदा झाला आहे. विधानसभा निवडणुकीत 55 पैकी 41 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला यश आले आहे. महाराष्ट्रात आता महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्याला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तसेच महायुतीची उद्या दिल्ली येथे महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)