Published on
:
21 Nov 2024, 4:54 pm
Updated on
:
21 Nov 2024, 4:54 pm
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणीच्या खटल्यास स्थगिती द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला.
दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवालांनी दाखल केलेल्या याचिकेवर अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली. न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांच्या एकल खंडपीठाने केजरीवाल यांच्याविरुद्ध ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत ट्रायल कोर्टाचा आदेश रद्द करण्याची मागणी करणारा स्थगिती अर्ज आणि याचिका या दोन्हींवरील युक्तिवाद विचारात घेण्यासाठी या प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबर रोजी ठेवली आहे.
ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केजरीवाल यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वकिलाने सांगितले की, ६ वे पुरवणी आरोपपत्र आणि ७ वे पुरवणी आरोपपत्र सारखेच आहेत, त्यात नवीन काही नाही, साक्षीदारांचे जबाबही तेच आहेत जे आधीच्या आरोपपत्रात आहेत.