अर्धवट सोडलेल्या कामामुळे नागरिकांची गैरसोय:कॅन्टोन्मेंट बोर्ड डेव्हलपमेंट एरियामध्ये 2 वर्षांपासून काँक्रिटीकरण रखडले

2 days ago 2
देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक १ मधील डेव्हलपमेंट एरियातील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनधारकांना रोजच जीव मुठीत घालून मार्गक्रमण करावे लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर हा वर्दळीचा रस्ता पूर्ण करावा आणि वाहनधारकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी छावा संघटनेचे मुस्लिम आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रशिद सय्यद यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले की, देवळाली कॅम्पमध्ये वॉर्ड क्र. १ डेव्हलपमेंट एरिया येथे २ वर्षांपासून सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद आहे. गेल्या २ वर्षात शासनाने देवळाली मतदारसंघात सिमेंट रस्त्यांसाठी निधी मंजूर करून ६ बाय ३० मीटरचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला गेला. मुख्य कार्यकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हे काम आमचे नसून बांधकाम विभागाचे आहे. आम्ही काहीही उत्तर देऊ शकत नाही, असे उत्तर देण्यात आल्याने नागरिकांची बोळवण होत आहे. नागरिकांकडून या कामांबाबत मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांच्याकडे देण्यात आले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article