अल्पवयीन खेळाडूवर कोचने हॉटेलमध्ये केला बलात्कार:छत्रपती संभाजीनगरच्या वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

2 days ago 2
खेळाडूवर खासगी कोचने शहरातील एका हॉटेलमध्ये बलात्कार कल्याची घटना मंगळवारी (15 ऑक्टोबर) उघडकीस आली. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी जगन्नाथ गोरडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. हॉटेलच्या मालक मॅनेजरवरही गुन्हा दाखल केला. आरोपी खासगी कोच शिवाजी गोरडे खो-खोच्या स्पर्धेचे धडे देत होता. या शाळेतील रोहिणी (नाव बदलले) विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्याचे कारण देऊन आरोपीने हा प्रकार केल्याचे फिर्यादीतून उघड झाले आहे. मैत्रिणीकडून पाठवले मेसेज घाबरलेल्या मुलीने याबाबत पंधरा दिवस वाच्यता केली नाही. परंतु तिच्या मैत्रिणीमार्फत आरोपी सतत पाठलाग करत रहिला. त्यावेळी तिने ही बाब पालकांच्या निर्दशनास आणून दिली. त्यातंर पालकांच्या सोबत पीडिता पोलिसापर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी कोच विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मॅनेजरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मागितली खंडणी कर्जाची फाइल मंजूर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका बँकेच्या मॅनेजरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर 40 लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणारा आणि एका महिलेविरुद्ध जवाहरनगर पाेलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धार्थ ठोकळ असे आराेपीचे नाव आहे. सिद्धार्थ ठोकळ याने काही महिन्यांपूर्वी संबंधित बँक मॅनेजरची भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ता असल्याचे भासवले. सांगितले. त्यानंतर काही कर्ज प्रकरणे बँकेत सादर करून ती मंजूर करण्याची विनंती केली. एके दिवशी महिलेसोबत तो बँकेत गेला. त्या महिलेला ब्यूटी पार्लर व्यवसायाकरिता 10 लाखांचे कर्ज हवे असल्याचे सांगत फाइल सादर केली. मात्र या फाइलमध्ये त्रुटी असून प्रकरणे मंजूर होत नसल्याचे मॅनेजरनी सांगितले. मात्र, ठोकळ याने बँकेत येऊन कर्ज प्रकरण मंजुरीसाठी धमकी दिली. महिलेने मॅनेजरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून हे ब्लॅकमेलिंग सुरू केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article