अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल:15 दिवसांपासून करत होता पाठलाग

2 hours ago 1
कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करून अश्‍लिल शेरोशायरी करणाऱ्या तरुणाविरुध्द कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. ७ रात्री उशीरा गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील अल्पवयीन विद्यार्थीनी गावातील शाळेत जाते. सदर विद्यार्थिनी घरून निघाल्यानंतर तसेच शाळा सुटल्यानंतर अंकुश सुर्यवंशी (रा. बाभळी) हा तरुण त्या विद्यार्थीनीचा पाठलाग करीत होता. मागील पंधरा दिवसांपासून तो तिच्या मागावरच राहात होता. शाळेतून घरी परत येत असतांना तो विद्यार्थीनीकडे पाहून अश्‍लिल हावभाव करीत होता तर अश्‍लिल बोलत होता. सदर प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारतो अशी धमकीही त्याने विद्यार्थीनीला दिली होती. एवढेच नव्हे तर त्याने विद्यार्थीनीच्या कुटुंबियांना त्रास होण्यासाठी तिच्या आईच्या मोबाईलवर फोन करीत होता. दरम्यान अंकूश याच्या धमकीमुळे विद्यार्थीनी घाबरून गेली होती. सदर प्रकार घरी सांगितल्यास आपले काही बरेवाईट होईल किंवा घरची मंडळी शिक्षण सोडून देण्यास भाग पाडतील अशी भिती तिला होती. त्यामुळे तीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र अंकूश याच्याकडून होणारा त्रास वाढत गेल्यामुळे अखेर तिने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला सोबत घेऊन थेट कळमनुरी पोलिस ठाणे गाठले. त्या विद्यार्थीनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अंकूश याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक संतोष इंगळे पुढील तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर अंकूश फरार झाला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article